श्रीरामपूर:-ऑपरेशन सिंदूर मध्ये अतुलनीय शौर्य व पराक्रम दाखवणारे माळेवाडी चे भूमिपुत्र कमांडिंग ऑफिसर श्री देवेंद्र औताडे यांना भारत सरकारने शौर्य पदककेले जाहीर – माळेवाडी ग्रामस्थांकडून भव्य नागरी सत्कार.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
ऑपरेशन सिंदूर मध्ये अतुलनीय शौर्य व पराक्रम दाखवणारे माळेवाडी चे भूमिपुत्र कमांडिंग ऑफिसर श्री देवेंद्र औताडे यांना भारत सरकारने शौर्य पदककेले जाहीर – माळेवाडी ग्रामस्थांकडून भव्य नागरी सत्कार.
भारत – पाकिस्तान यांच्यात नुकत्याच पार पडलेल्या युद्धात ऑपरेशन सिंदूर मध्ये अतुलनीय शौर्य व पराक्रम दाखवणारे माळेवाडी चे भूमिपुत्र कमांडिंग ऑफिसर श्रीनगर एअर फोर्स एअरवेज येथे कार्यरत असलेले विंग कमांडर श्री.देवेंद्र औताडे यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना शौर्य पदक जाहीर करून सन्मानित केले आहे. ही आपल्या सर्वांसाठी गौरवाची व अभिमानाची बाब आहे. त्यांच्या शौर्याच्या आणि कर्तुत्वाच्या गौरवासाठी श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडीचे ग्रामस्थांच्या वतीने उद्या मंगळवार दिनांक 16/09/2025 रोजी दुपारी १२ वा.”भव्य जाहीर नागरी सत्कार समारंभ” आयोजित करण्यात आला आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच सन्मा.किरणजी सावंत पाटील साहेब ( प्रांताधिकारी श्रीरामपुर ) सन्मा. मिलिंद कुमार वाघ साहेब ( तहसीलदार श्रीरामपूर ) सन्मा.नितीनजी देशमुख साहेब (वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर ) सन्मा.अरुणजी धनवडे साहेब (पोलीस निरीक्षक श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन )* आदी मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच श्रीरामपूर तालुक्यातील *सर्व माजी सैनिक* यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी आपण सर्व देशभक्तांनी उपस्थित राहावे ही विनंती करण्यात आली आहे.
ठिकाण -हनुमान मंदिर, ग्रामपंचायत कार्यालय जवळ, माळेवाडी ता.श्रीरामपूर





