वाई:-सिद्धी हा पूर्णविराम नव्हे स्वल्पविराम समज – मा.मदनदादा भोसले.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई दि.07
सिद्धी हा पूर्णविराम नव्हे स्वल्पविराम समज
– मा.मदनदादा भोसले.
वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी विद्यार्थिनी सिद्धी संतोष धनवडे हिची भारतीय नौदलामध्ये अग्निवीर या पदावर नुकतीच निवड झाली. तिचे प्रशिक्षण ओडीसा आय.एन.एस. चील्का येथे होणार आहे. त्यासाठी ती मंगळवार दि. ०८ एप्रिल रोजी जाणार आहे. या पार्श्वभूमीवर तिचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी सन्मान केला. त्यावेळी बोलताना मदनदादा भोसले म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे अपार कष्ट करण्याची क्षमता असते, हे सिद्धीने सिद्ध करून दाखविले आहे. पण सिद्धी हा तुझ्या यशस्वितेसाठी पूर्णविराम नव्हे, तर तो स्वल्पविराम समजून या पदावर संतुष्ट न राहता तू भारतीय नौदलातील उच्च पदांना गवसणी घालावी अशा सदिच्छा त्यांनी दिल्या व आपल्या गावाबरोबरच वाई पंचक्रोशीचाही नावलौकिक वाढवावा असे मत व्यक्त करून, नागेवाडी सारख्या छोट्या गावातून आलेल्या मुलीने मिळविलेले यश इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. या प्रसंगी सिद्धीचे आई वडील, डॉ. शिवाजी कांबळे, डॉ. संग्राम थोरात, श्री. जितेंद्र चव्हाण, सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.
सिद्धी धनवडे हिने मनोगत व्यक्त करताना संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षणाचे प्रशिक्षक विशाल महांगडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक प्रो. (डॉ.) विनोद वीर यांनी सिद्धीच्या परिश्रमाची माहिती दिली.