वाई:-सह्याद्री नगर येथे भारतीय जनता पार्टी च्या सदस्यांचा 6 एप्रिल रोजी भाजपा स्थापना दिनाचा कार्यक्रम संपन्न.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सह्याद्री नगर येथे भारतीय जनता पार्टी च्या सदस्यांचा 6 एप्रिल रोजी भाजपा स्थापना दिनाचा कार्यक्रम संपन्न.
रविवारी दिनांक 6 एप्रिल रोजी भाजप स्थापना दिनानिमित्त सह्याद्रीनगर याठिकाणी आर्या हॉल मध्ये कार्यक्रम आयोजित केला होता.
सदर कार्यक्रमांस वाई विधानसभेचे नेते आदरणीय मदनदादा भोसले, जिल्हा सरचिटणीस रोहिदास बापू पिसाळ, विकास कणसे, जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे, अजय मांढरे, कामगार आघाडी अध्यक्ष तेजस जमदाडे, वाई तालुका अध्यक्ष दिपक दादा ननावरे, महाबळेश्वर तालुका अध्यक्ष अनिल नाना भिलारे, वाई शहर अध्यक्ष विजय ढेकाणे, नगरसेवक महेंद्र धनवे व आजी माजी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
आलेल्या पदाधिकारी व उपस्थितांचे स्वागत श्री. दिपक दादा ननावरे यांनी केले. रोहिदास बापू पिसाळ यांनी प्रास्ताविक केले. जेष्ठ सदस्य काशिनाथ जी शेलार व यशवंत जी लेले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर विकास जी कणसे यांनी भाजपा चा आजवरचा दैदीप्यमान प्रवास उपस्थितांना सांगून त्यानंतर वाई विधानसभेचे नेते मदन दादा भोसले यांनी सर्वांनाच भाजपा स्थापना दिनाच्या शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.