खंडाळा:-खंडाळा तहसिल कार्यालय सेतू विभागात भ्रष्ट कारभाराचे भांडे फोड! सेतू ऑपरेटरांवर होणार गुन्हा दाखल….
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
खंडाळा तहसिल कार्यालय सेतू विभागात भ्रष्ट कारभाराचे भांडे फोड! सेतू ऑपरेटरांवर होणार गुन्हा दाखल….
खंडाळा तहसील कार्यालयातील नागरिक सुविधा केंद्राचे ठेकेदार विद्या ऑनलाइन सर्विसेस पुणे व काही भ्रष्ट अधिकारी खासगी सेतु कामगार यांच्या भ्रष्टकारभाराची पोलखोल स्टिंग ऑपरेशन करून माहिती अधिकार जनजागृती केंद्र महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष श्री. सुनीलकुमार बावधनकर यांनी केली आहे याबद्दल सविस्तर वृत्त असे की खंडाळा तहसील कार्यालयातील नागरी सुविधा केंद्राचा ठेका पुणे येथील विद्या ऑनलाईन सर्व्हिसेस कंपनी यांना देण्यात आलेला आहे पूर्वी या नागरिक सुविधा केंद्राचा ठेका सत्यम स्वयं रोजगार सहकारी संस्था श्री. विनायक जंगम मलकापूर यांचे कडे होता. सदर ठेकेदारावर यापूर्वी अनेक भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते तसेच त्यांना शासकीय दंड झालेले होते. यानंतर विद्या ऑनलाईन सर्विसेस पुणे यांना हा ठेका मिळाला पण या कंपनीने सुद्धा विनायक जंगम या भ्रष्ट व्यक्तीची व्यवस्थापक या पदावर नेमणूक केलेली आहे. जुन्या असणाऱ्या याच नागरी सुविधा केंद्राच्या ठेकेदाराची नवीन ठेकादार कंपनीने व्यवस्थापक पदी नेमणूक करणे ही एक आश्चर्याची बाब आहे. या व्यक्तीने तहसील कार्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या मदतीने हा सेतू चालवण्यास सुरुवात केली व या सेतू मध्ये मुकेश सपकाळ आदिनाथ देवकाते व इतर लोकांना ऑपरेटर म्हणून कामकाजास ठेवलेले आहे यात महत्त्वाचे काम मुकेश सपकाळ व आदीनाथ देवकाते पाहतात. या दोघांचे तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांची लागेबांधे असल्याचे दिसून आले यांनी तहसीलदार यांची डिजिटल सिग्नेचर चा गैरवापर करून व सेतू केंद्राच्या शासकीय आयडीचा गैरवापर करून खाजगी आपले सरकार केंद्र चालक सुलतान शेख याला बाहेर सदर आयडी वापरण्यात दिलेला आहे सदर मुकेश सपकाळ व आदिनाथ देवकाते यांना तहसील कार्यालयात लोकांकडून जास्त पैसे घेता येत नाहीत म्हणून सुलतान शेख यांच्याकडे आलेले पक्षकार पाठवून त्यांच्याकडून 200 ते 2000 असे शुल्क उकळण्यात येत आहे व तुमचे लवकर काम करून देतो असे सांगण्यात येत आहे. याच गोष्टीचा विरोधाभास असा की खंडाळा तालुक्यातील इतर आपले सरकार सेवा केंद्रातून येणारे दाखले मात्र हेच लोक दहा ते पंधरा दिवस किंवा महिना महिना दाखले एप्रोव केले जात नाहीत. परंतु सुलतान शेख यांच्याकडे जास्त पैसे घेऊन सदर दाखले दाखले दोन ते तीन तासात मिळतात असे निदर्शनास आले आहे. सदर शुल्क हे अधिकाऱ्यांना जात असावा असा संशय आहे कारण वारंवार लेखी तक्रारी होऊन सुद्धा सदर अधिकारी या प्रकरणाकडे डोळेझाक करताना दिसतात व सदर सेतू कर्मचाऱ्यांना पाठीशी घालताना दिसत आहेत यामुळे सदर रकमेतील काही टक्केवारी यांना जात आहे असे प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे. या एक ते दीड वर्षात या सेतू कर्मचाऱ्यांकडे अमाप पैसा आल्याचे दिसून आले आहे याची सुद्धा चौकशी प्रशासनाने केली पाहिजे असे निवेदन माननीय जिल्हाधिकारी व सातारा यांना देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्रकरणाचे दखल घेऊन सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून संबंधितावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे पत्र तहसीलदार खंडाळा व निवासी नायब तहसीलदार खंडाळा यांना पाठवले आहे व दिनांक ८ रोजी सदर प्रकरणाची सुनावणी करण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. या सुनावणीनंतर सदर दोषींवर गुन्हा दाखल होणार का हा प्रश्न सर्वांच्या पुढे निर्माण झाला आहे !