खटाव:-भरवशाच्या करखान्याचा बॉयलर प्रदीपन नवीन रोलर पूजन उत्साहात संपन्न!.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
भरवशाच्या करखान्याचा बॉयलर प्रदीपन नवीन रोलर पूजन उत्साहात संपन्न!.
मायणी प्रतिनिधी_
दि.,खटाव माण दुष्काळी तालुक्याचा जिव्हाळ्याचा व भरवशाचा असलेला खटाव माण ऍग्रो प्रोसेसिंग कारखान्याचा बॉयलर प्रदिपण व रोलर पूजन समारंभ दिमाखात पार पडला या बॉयलर प्रदीपन सोहळ्याचे पूजन खटाव माण अग्रो कारखान्याचे को चेरमन मनोज दादा घोरपडे व त्यांच्या पत्नी सौसमता घोरपडेयांच्या हस्ते पार पडले त्यानंतर नवीन रोलर पूजन मिलचे (झीरो मिल)पूजन कारखान्याचे चेअरमन प्रभाकर घार्घे व त्यांच्या सुविध पत्नी सौ इंदिरा घारगेयांच्या हस्ते संपन झाला यावेळी बोलताना प्रभाकर घार्गे म्हणाले की के एम शुगरचा पाचवा गळीत हंगाम पाऊस नसल्याने कारखानाअडचणीत जाण्याची परस्थिती निर्माण झाली होती परंतु श्री गणरायाच्या कृपेने या दुष्काळी भागात दमदार पाऊस सुरू झाल्याने यंदाचा पाचवा गळीत हंगाम यशस्वी पणे पूर्ण होईल याची खात्री वाटू लागली आहे सध्या सुरू असलेल्या पावसामुळे कारखाना ऊसतोडणी ,वाहतूकदार ,कर्मचारी शेतकरी यांना मोठा दिलासा मिळाला आहे कारखान्याचा बाबत ते म्हणाले की मागील चार हंगामात करखान्याचे दोनच प्रकल्प चालू होते त्यामुळे दर देताना अडचणी निर्माण होत होत्या परंतु या हंगामात डिस्टलरी व इथेनॉल प्रकल्प सुरू होत असल्याने कारखाना सर्वार्थाने परिपूर्ण होत आहे या कारणामुळे साखर व इतर उत्पादनात वाढ होणार आहे त्यामुळे इतरांच्या बरोबरीने कारखाण्यास उसाचा दर देण्यास काहीही अडचण निर्माण होणार नाही तसेच शेतकऱ्यांचे ,ऊसतोड कामगारांच्या ,कर्मचाऱ्यांचे, वाहतूक दारांचे पैसे वेळेवर देण्याचे धोरण यापुढे ही सुरू राहणार आहे तरी या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी या कारखान्याला आपला ऊस देऊन सहकार्य करावे अशी विनंती ही त्यांनी केली या कार्यक्रमास कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे ,विक्रम घोरपडे,हणमंत घोरपडे,विनायक घोरपडे,बोलासो पोळ,प्रशांत कणसे, मुरलीधर पोळ(शेट),कृष्णात शेडगे मामा संचालक,महेश बाबा जाधव,अध्यक्ष भाजपा कराड उत्तर,अण् रजतणासाहेब निकम,नारायण माने, रामभाऊ खाडे,गणपतराव माने,तानाजी पवार,महेश घार्गे संचालक,प्रीती घार्गे,सौ.समता घोरपडे,नंदकुमार पुस्तके,अशोक नलवडे,कर्मचारी, वाहतूकदार, शेतकरी ,मोठ्यासंखेने उपस्थित होते शेवटी सुभाष मोहिते यांनी आभार मानले(फोटो बॉयलर प्रदीप पण करताना मनोज दादा घोरपडे त्यांच्या पत्नी सौ समता घोरपडे प्रभाकर घार्गे, प्रीती घार्गे, कृष्णा शेडगे व इतर)