कालगाव ता.कराड येथील ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ व माता जोगूबाई यात्रा बुधवार दि.2 एप्रिल व दि.3 एप्रिल रोजी
पत्रकार सुशील कुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुशील कुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
कालगाव ता.कराड येथील ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ व माता जोगूबाई यात्रा बुधवार दि.2 एप्रिल व दि.3 एप्रिल रोजी.
कालगाव ता.कराड येथील ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ व माता जोगूबाई यात्रा बुधवार दि.2 एप्रिल व दि.3 एप्रिल रोजी विविध कार्यक्रमाची साजरी होणार असल्याची माहिती यात्रा समितीच्या व ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली. यात्रेनिमित्त प्रतिवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी यात्रे संदर्भात बैठक आयोजित करण्यात येते बैठकीत ठरल्याप्रमाणे मंगळवार दि. 1 रोजी रात्री श्रीचा गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे. बुधवार दि. 2 रोजी पहाटे दंडस्थान 3 ते 7.30.अभिषेक 7.30 ते 8.30.रात्री श्रीचा छबीना 11.40 ला मिरवणूक निघणार आहे तरी गुरुवारी पहाटे मनवकरांच्या तमाशाची गणगौळण आणि दुपारी व रात्री मनवकरांच्या तमाशाचे कार्यक्रम होणार आहेत.तरी शुक्रवारी व शनिवारी ऑर्केस्ट्रा होणार आहे. यावर्षी यात्रा तिथी प्रमाणे एक दिवस अगोदर आली आहे तरी सौंदर्यप्रसाधने ,खेळणी, मिठाईचे दुकान व पैपाहुण्यांनी यात्रेस उपस्थित राहून यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.