श्रीरामपूर:-केंद्रीय नवोदय विद्यालय परीक्षेत श्रीराज शिंदेचे यश.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
केंद्रीय नवोदय विद्यालय परीक्षेत श्रीराज शिंदेचे यश.
माळेवाडी (प्रतिनिधी ) श्रीरामपुर तालुक्यातील अशोक आयडीयल स्कुल प्रगतीनगर शिरसगाव विद्यालयातील इयत्ता पाचवीचा विद्यार्थी श्रीराज अरुण शिंदे याची नुकत्याच झालेल्या केंद्रीय नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत श्रीरामपुर तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातून निवड झाली आहे . त्याचे मिळविलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल त्याचे अशोक आयडीयल स्कुलचे प्राचार्य व सर्व शिक्षक ‘ विद्यार्थी यांच्या वतीने तसेच नाऊर येथील ग्रामस्थांच्या वतीने आणि परिसरातील सर्व नागरिकांकडून विशेष कौतुक होत आहे . त्याच्या या यशाबद्दल खाजदार गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस व प्रवक्ते अविनाश आदिक . माजी नगराध्यक्ष अनुराधाताई आदिक यांनी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या श्रीराज हा खा गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्था संचलित कै . रघुनाथ कृ ष्णाजी पाटील औताडे विद्यालय माळेवाडी येथील सहाशिक्षक अरुण शिंदे आणि सहशिक्षिक सविता शिंदे यांचा मुलगा आहे.