चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत ज्योतिष शास्त्र टिकणार आहे.
प्रतिनीधी:- दिलिप पुस्तके सातारा जिल्हा विभाग प्रमुख

चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत ज्योतिष शास्त्र टिकणार आहे___श्रीमत् जगद्गुरु आद्य शंकराचार्य मायनी प्रतिनिधी__आपल्या ऋषी-मुनींनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत अनेक शास्त्रे लिहिली आहेत अनेक शास्त्रे काळाच्या ओघात लुप्त पावली आहेत परंतु जोपर्यंत चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत ज्योतिषशास्त्र टिकणार आहे कारण ज्योतिष शास्त्र हे चंद्र आणि सुर्य यांच्यावर अवलंबून आहे असे स्पष्ट मत आद्य जगद्गुरु स्वामी शंकराचार्य नरसिंह भारती विद्यापीठ कोल्हापूर यांनी गोंदवले येथे राज्यस्तरीय अधिवेशनात समारोप प्रसंगी बोलताना केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंत भट होते या अधिवेशनात पंचांग कर्ते मोहन दाते यांनी ज्योतिष व ग्रह तत्वे याविषयी विचार मांडले प्रदीप पंडित यांनी गुणमेलन डॉक्टर विकास खिलारे यांनी विवाह योग प्रसन्न मुळे यांनी संतती योग मंगेश महाडिक यांनी हस्तरेषा दत्तात्रेय चिवटे यांनी समाजातील योग व उपचार विवेक शास्त्री गोडबोले यांनी नक्षत्र परिहार सचिन बेहरे यांनी वास्तु ज्योतिष श्रीधर कुलकर्णी यांनी बदलत्या काळातील ज्योतिष व ज्योतिषी गोविंद कोष्टी यांनी ज्योतिष मार्गदर्शक शास्त्र शरद पायगुडे यांचे डावजिग यांचे तर सिद्धेश्वर मारटकर यांनी भारतातील व जगातील राजकीय भवितव्य याविषयी विचार व्यक्त केली सर्व ज्योतिषांनी वर्षातून एकदा अधिवेशन घ्यायचे असे ठरविले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक दिलीप पुस्तके यांनी केले तर संयोजन नंदकुमार जोशी यांनी केले यानंतर ज्योतिष अधिवेशनाची सांगता झाली