सुपा:-(अहिल्यानगर)-आयपीएस अधिकारी पठारेंचे अपघाती निधन! (पारनेर येथील वाळावणे गावावर शोककळा,-गाव बंद!)
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
आयपीएस अधिकारी पठारेंचे अपघाती निधन!
(पारनेर येथील वाळावणे गावावर शोककळा,-गाव बंद!)
दि ३१ सुपा (अहिल्यानगर)
पारनेर तालुक्यातील वाळावणे येथील भुमिपुत्र,व मुंबईतील आयपीएस अधिकारी सुधाकर भाणुदास पठारे वय वर्षे ५० यांचे शनिवारी तेलंगनातुन परतांना अपघाती निधन झाले, पठारे यांच्या निधनाने वाळावणे गावावर शोककळा पसरली असुन सर्व ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत शोककळा व्यक्त केली रविवारी दुपारी वाळावणे येथे दुपारी त्याच्यावर शासकिय पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.
पठारे हे प्रशिक्षणासाठी हैद्राबाद येथे गेले होते तेथे आपले नातेवाईक भागवत खोडके यांच्यासह जोतिंलिंगाच्या दर्शनासाठी जात आसतांना त्यांच्या गाडीला मालमोटारीने समोरासमोर धडक दिली. त्यात त्या दोघांचाही मृत्यु झाला.घटना समजताच ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली.
गावातील कोणत्याही सामाजीक कामात त्यांचा सहभाग असायचा,अनेक शैक्षणिक संस्थांना त्यांनी अर्थिक सहकार्य केलेले आहे.त्याच्या आई ,वडीलांचे ही एक वर्षापुर्विच निधन झालेले आहे.त्याना दोन भाउ. पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परीवार आहे.
चौकट- (पठारे यांचा सेवा प्रवास)
पठारे यांनी कोल्हापुर ,राहुरी कृषी पदवी घेऊन शिक्षण घेतले .स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातुन १९९५ मधे ते जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले.त्यांनतर ते विक्रिकर अधिकारी वर्ग १ म्हणुन निवड झाली. १९९८ मध्ये पोलिस उपधिकारी झाले.त्यानंतर पोलिस खात्यात चांगली कामगिरी केली,नंतर ते पोलिस उपअधिक्षक म्हणुन पंढरपुर,कोल्हापुर येथे सेवा केली.सद्या ते मुंबई बंदर परीमंडळाचे पोलिस उपायुक्त म्हणुन कार्यरत होते,
रविवार दि.३० रोजी त्याच्या गावी वाळावणे येथे त्यांचे पार्थिव देहावर शाषकीय पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यात आले.