साखरवाडीतील सिनेमा रोडची दुरुस्ती करावी अन्यथा स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा.
प्रतिनिधी:- शुभम भापकर फलटण :-7972521412

साखरवाडीतील सिनेमा रोडची दुरुस्ती करावी अन्यथा स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा
प्रतिनिधी शुभम भापकर
साखरवाडी मध्ये काळुबाई मंदिर ते तलाठी कार्यालय इथपर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला असून जागोजागी खड्डे पडले आहेत हा रस्ता आरोग्य केंद्र,शाळा,महाविद्यालय यांना जोडणारा बाजारपेठेतील अत्यंत महत्त्वाचा असल्याने यावरून नागरिकांचे याचा सतत चालू असते या खराब रस्त्या मुळे सर्वसामान्य नागरिक,शाळकरी विद्यार्थी,आजारी पेशंट यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे वेळोवेळी सांगूनही या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही
त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष फलटण तालुका अध्यक्ष दादा जाधव यांच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंता यांना निवेदन दिले आहे २१ जुलै पर्यंत रस्ता दुरुस्ती न केल्यास २२ जुलैला रस्त्यावर पडलेल्या त्याच खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आलेला आहे