सातारा जिल्हयात अश्लील नृत्य कार्यक्रम बंदीसाठी महिला आक्रमक.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सातारा जिल्हयात अश्लील नृत्य कार्यक्रम बंदीसाठी महिला आक्रमक.
सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाला मान्यता आहे. परंतु, काही कार्यक्रम करून वातावरण दूषित करणाऱ्या गौतमी व राधा पाटील यांच्या कार्यक्रमाला सातारा जिल्ह्यात बंदी घालण्यासाठी राजकीय पक्षाच्या पदाधिकारी महिला आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना लेखी निवेदन दिलेले आहे. निवेदन स्वीकारतो परंतु, नेत्यांना याबाबत फोन करण्यास सांगू नका. असाही त्यांनी मौलिक सल्ला दिल्याची माहिती सौ कांचन साळुंखे यांनी दिली आहे.
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, सातारा जिल्हयाला चांगली सामाजिक संस्कृती आणि छत्रपतींचा वारसा लाभलेला आहे .अशा या चांगली सामाजिक संस्कृती असलेल्या ऐतिहासिक राजधानी सातारा मध्ये
वेगवेगळया मंडळांच्या पुरुष व महिला कार्यकत्यांमार्फत तसेच महिला मेळाव्यात
सुध्दा परंपरा व संस्कृती सोडून स्टेजवर अश्लील नृत्याचे आयोजन केले जाते.
सदर डान्स् शो मध्ये स्टेजवर लहान मुली-मुलांना बोलावून अश्लील हावभाव करणेस भाग पाडले जाते. यामुळे लहान मुला-मुलींचे मनावर विपरीत परिणाम होत असतो. अशा
प्रकारे डान्स शो चे आयोजन करणा-या मंडळांच्या कार्यक्रमांवर कायमची बंदी घालणे विनंती महिला वर्गाने निवेदनाद्वारे केली आहे.
धार्मिक यात्रेनिमित्त आयोजित केले जाणारे तमाशा फड, भारुड इ. सामाजिक
परंपरा, कला व संस्कृती जपणा-या कार्यक्रमांचे आयोजनास काहीच हरकत नाही. गौतमी पाटील, राधा पाटील यांच्या सारख्या अन्य महिलांच्या अश्लील चाळे व नृत्य करणा-या कार्यक्रमांमुळे महिला व मुली बेपत्ता होणेचे प्रमाण सातारा जिल्ह्यात वाढले आहे. त्यास अशा प्रकारचे कार्यक्रम कारणीभूत ठरत आहेत.तरी परंपरा व संस्कृती सोडून स्टेजवर वेगवेगळे हावभाव व इशारे केले जाणा-या कार्यक्रमांना कायमची बंदी घालावी, अशी विनंती महिलांनी केली.
या निवेदनावर सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका व सामाजिक कार्यकर्त्या कांचन साळुंखे, प्रतिभा शेलार, समिंद्रा जाधव, नलिनी जाधव ,अंजली शिंदे, जयश्री शेलार, अंजली जठार, सुनीशा शहा यांच्या सह्या आहेत. दरम्यान, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्हा पालकमंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक ३० मार्च रोजी गौतमी पाटील यांच्या कार्यक्रम आयोजित करण्याच्या हालचाली मंत्री महोदयाच्या सामाजिक भान नसलेल्या काही समर्थकांनी केली आहे. त्याला प्रचंड विरोध होत असल्याने सातारा पोलीस दल व प्रशासन काय भूमिका घेत आहे ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. असही श्रीमती साळुंखे यांनी सांगितले. साताऱ्यातील सत्ताधारी भाजप सह अनेक राजकीय पक्षाच्या महिलांनीच उठाव केल्यामुळे आता हा कार्यक्रम होणार की नाही ? अशी चर्चा रंगू लागलेली आहे.
RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.
ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन
__________________________________
फोटो- सातारा जिल्ह्यात अश्लील नृत्य कार्यक्रम करू नये. यासाठी निवेदन देताना महिला पदाधिकारी (छाया- अजित जगताप सातारा)