श्रीरामपूर:-उपमुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते उद्या रामगिरी महाराजांना ‘ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार …..
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
उपमुख्यमंत्री शिंदेच्या हस्ते उद्या रामगिरी महाराजांना ‘ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार …..
श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांना उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याहस्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधिस्थळ असलेल्या पुणे जिल्हातील शिरूर तालुक्यातील वडु बुद्रुक येथे उद्या शनिवारी दि . २९ मार्च रोजी सकाळी ११ .30 वा .या पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समिती . महाराष्ट्र यांच्यावतीने उद्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्ताने हिंदू धर्म रक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल गंगागिरी महाराज संस्थानचे मठाधिश महंत रामगिरी महाराज यांना हा पुरस्कार उद्या प्रदान करण्यात येणार आहे.या कार्यक्रमास भक्त गणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बेटाच्या वतीने करण्यात आले आहे.