ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पुसेसावळी :- राहुल सावंत इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या सैनिकासाठी राख्या.
प्रतिनिधी विनोद पाटील कराड :-9762274165

खटाव :-पुसेसावळी -राहुल सावंत इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या सैनिकासाठी राख्या.
राहुल सावंत इंग्लिश मिडीयम स्कूल पुसेसावळी ता.खटाव जि.सातारा स्कुलच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या सिमेवर लढणारे सैनिक रक्षाबंधन सणासाठी आपल्या घरी येऊ शकत नाहीत यांचा विचार करून स्कूलचे प्राचार्य हेमंत जाधव सर व शाळेचे क्रिडा शिक्षक श्री.रविंद्र पिसाळ सर यांचे संकल्पनेतुन सिमेवर देशासाठी लढणारे सैनिकांसाठी विद्यार्थ्यांनी उत्साहाने राख्या जमा केल्या त्या पाठविण्यात आल्या.