वाई:-येथील साठ वर्षांपासूनची वसाहत भिम नगर जमीन दोस्त.(एक भिमनगर संपुष्टात)
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार नित्यानंद मोरे वाई शहर प्रतिनिधी
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई.दि. २५
वाई तालुक्यातील साठ वर्षांपासूनची वसाहत भिम नगर जमीन दोस्त.(एक भिमनगर संपुष्टात)
सातारा जिल्ह्यातील वाई तालुका यशवंत नगर ग्रामपंचायत हद्दीत असलेले गेली साठ वर्षांपासूनची वसाहत भीम नगर आज पोलिसांच्या मदतीने उठवण्यात आले आज सकाळपासूनच भिम नगर येथे मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा तसेच ट्रॅक्टर ट्रॉली जेसीबी यांचे आगमन होऊन सकाळी अकरा वाजता भिम नगर उठवण्यासाठी तयारी सुरू होती कोणी या ठिकाणी आपल्या व्यथा मांडत होते तर कोणी स्वतःच आपला पसारा आवरून जाण्याच्या तयारीत होते यावेळी या ठिकाणी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे काही पदाधिकारी उपस्थित होते तेही तेथील लोकांना पसारा आवरण्यासाठी मदत करत होते यावेळेस दुपारच्या वेळेस दुपारी चार च्या दरम्यान महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते व पोलीस प्रशासन यांच्यात थोडी शाब्दिक चकमक झाली. यावरून पोलीस प्रशासनाने महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे व कार्यकर्ते यांना नजर कैदेत ठेवले याचा प्रणित मोरे व इतर कार्यकर्त्यांकडून निषेध आला.