आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नवी मुंबई (कळंबोली) येथे 3 जानेवारी 26 रोजी समाज भूषण पुरस्काराने सत्यशोधक रघुनाथ ढोक होणार सन्मानित !!!

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

नवी मुंबई (कळंबोली) येथे 3 जानेवारी 26 रोजी समाज भूषण पुरस्काराने सत्यशोधक रघुनाथ ढोक होणार सन्मानित !!!

*मुंबई /कळंबोली* – श्री .संत सावतामाळी समाज विकास मंडळ, कळंबोली, नवी मुंबईचे वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मुक्ती दिनानिमित अनेक कार्यक्रम 3 जानेवारी रोजी आयोजित करण्यात येतअसते यंदाचे हे वर्ष 18 वे असून या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंती निमित्त सत्यशोधक चळवळीचे पुणे येथील कार्यकर्ते फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अंड सोशल फौंडेशनचे अध्यक्ष व महात्मा फुले चरित्र साधने साहित्य व प्रकाशन समिती,महाराष्ट्र शासनाचे सदस्य सत्यशोधक रघुनाथ ढोक यांचा शनिवार दि.3 जानेवारी 2026 सायंकाळी 7 वाजता रोजी न्यू सुधागड एज्युकेशन सोसायटी च्या भव्य ग्राऊंडवर समाज भूषण पुरस्कार ने मोमेंटो शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन महाराष्ट्राचे अन्नपुरवठा व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ व महाराष्ट्राचे ग्रामविकासमंत्री व सोलापूरचे पालक मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचे शुभहस्ते गौरव करण्यात येणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुल सावे आमदार प्रशांत ठाकूर ,विक्रांत पाटील ,योगेश टिळेकर आणि राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रुपाली चाकणकर उपस्थितीत रहाणार आहेत.
सत्यशोधक रघुनाथ ढोक हे विज्ञानयुगातही अंधश्रद्धा, मुहूर्त, कर्मकांड आणि
जातीभेदापलीकडे जावून गेली अनेक वर्षे सत्यशोधक विवाह, गृहप्रवेश तसेच जाती निर्मलून साठी जात विरहीत कामकाज विनामूल्य करीत आहेत. त्यांनी अनेक विवाहप्रसंगी वधू वर यांना व इतर कार्यक्रम प्रसंगी मान्यवरांना राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान ,फुले दांपत्य फोटो फ्रेम कायम भेट देतात .त्यांच्या या कार्यामुळे सत्यशोधक चळवळीला नवे बळ प्राप्त झाले आहे.
ढोक यांनी गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्र व तेलंगणात एकूण 54 सत्यशोधक विवाह व 15 वास्तू / गृहप्रवेश विधी मोफत पार पाडले असून, विविध सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रांत महाराष्ट्र सोबत इतर राज्यात देखील सातत्याने कार्यरत राहत त्यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, दिनांची साऊली ,महात्मा फुले गीतचरित्र आदी महत्त्वपूर्ण पुस्तकेही वेगवेगळ्या भाषेत प्रकाशित केलेली असून ते लवकरच लोकांना सहज सोफे भाषेत संविधान समजावे म्हणून डॉ.प्रल्हाद वडगावकर लिखित भारताचे संविधान व इतर पुस्तके प्रकाशित करणार आहेत. पुणे विद्यार्थी गृहाच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये लिपिक पदावर कार्यरत असूनही, त्यांनी समाजकार्याची ज्योत अखंड पेटत ठेवली आहे.
या पुरस्कार सोहळ्याची माहिती अध्यक्ष नितीन जाधव , कार्याध्यक्ष अँड.श्रीनिवास क्षीरसागर सचिव उद्धवराव भुजबळ यांनी श्री संत सावतामाळी समाज विकास मंडळातर्फे देण्यात आली असून या सोहळ्याप्रसंगी भव्य सावित्रीबाई फुले प्रतिमा व ग्रंथ दिंडीचे आयोजन ,खेळ पैठीणीचा कार्यक्रम हळदी कुंकू व वाण वाटप आणि समाजप्रबोधनावर व्याख्यानं असा भव्य सोहळा देखील दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत आयोजित केल्याचे म्हंटले आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button