आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
दहिवडी:-(माण)-राजे उमाजी नाईक जयंती उत्सव सोहळा संपन्न.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
राजे उमाजी नाईक जयंती उत्सव सोहळा संपन्न.

दहिवडी (ता. माण)
इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध बंड पुकारणारे उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारे व क्रांतीचे स्वप्न पाहणारे आपल्या देशातील निधड्या छातीचे वीर आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज दहिवडी (ता. माण) येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारणी सदस्या सौ. सोनिया जयकुमार गोरे (वहिनीसाहेब) यांनी या मिरवणुकीत सहभागी होऊन राजे उमाजी नाईक यांना विनम्र अभिवादन करून उपस्थितींना जयंती उत्सव सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मा.सभापती अतुलदादा जाधव ,युवानेते सिद्धार्थ गुंडगे यांच्यासह आदी मान्यवर या भव्य अशा मिरवणुकीत उपस्थित होते.




