ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जालना:-अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांवर अमानुषपणे झालेल्या लाठीचार्ज निषेधार्थ आज शिवशंभू संघटना पंढरपूर विभागाच्या वतीने जाहीर निषेध.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा PRR:-9146802009

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा PRR
जालना दि .5
अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांवर अमानुषपणे झालेल्या लाठीचार्ज निषेधार्थ आज शिवशंभू संघटना पंढरपूर विभागाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला तसेच दोषींवर योग्य ती कठोर कारवाई करून, मराठा बांधवांवर जालना पोलीस प्रशासनाने व्देषाच्या भावनेने गुन्हे दाखल केले आहेत ते त्वरित मागे घेण्यात यावे अशी मागणी तहसील कार्यालय पंढरपूर यांच्याकडे देण्यात आली. यावेळी शिवशंभू संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महादेव पवार, कामगार आघाडी प्रदेशाध्यक्ष प्रफुल डुबल, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख सदाशिव जमदाडे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शरद ताड, अमोल व्यवहारे, देवराज जावळे, इत्यादी उपस्थित होते.