मुंबई:-दहिसर येथे इवान याचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न.
पत्रकार रॉनी अँथनी सांताक्रुज शहर कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार रॉनी अँथनी सांताक्रुज शहर कार्याध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
मुंबई:-दहिसर येथे इवान याचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न.
मुंबई:-दहिसर येथे इवान याचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
परदेशात कामानिमित्त वास्तव्यास असलेले इवान चे वडील ओंकार शिंदे,आई शरॉन शिंदे यांचा त्याग पहावयास मिळतो. एका वर्षांपूर्वी इवान चा जन्म मुंबईत झाला. जन्मापासूनच तो त्याच्या आजी आजोबा सोबत मुबंई मध्ये वास्तव्यास असून त्याचा मोठा बंधू रॉनीत हा चौथी मध्ये इंग्रजी कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकत आहे. तो ही लहानपणापासूनच आजी-आजोबांसोबत मोठा झालेला असून त्यांनीही आई-वडिलांप्रमाणे त्याला प्रेम दिलेले आहे.आपल्या लहान मुलांना भारतात राहत असलेल्या आजी-आजोबांसोबत सोडून कामानिमित्त या दोन्ही मुलांच्या आई वडील दुबईमध्ये नोकरीमध्ये कार्यरत आहेत.या आई-वडिलांची स्तुती करावी तेवढी कमीच आहे. आपल्यापासून लहान मुलांना लांब ठेवून परदेशात कामा निमित्त वास्तव्य करणे ही तारेवरची कसरतच आहे. हे करत असताना त्यांच्या हृदयाला किती वेदना होत असतील हे फक्त त्यांच्या मनाला समजत असेल.परंतु मुंबईतील सांताक्रुझ या ठिकाणी राहत असेलेले त्या लहान मुलांचे आजी आजोबा ( शरॉन शिंदे यांचे आई वडील ) याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.तसेच दहिसर येथे राहत असलेले त्यांचे आजी आजोबा ( ओंकार शिंदे यांचे आई वडील ) हे हि यास अपवाद नाहीत.आदर्श आजी आजोबा कसे हवेत याचे छान उदाहरण यांनी प्रस्तुत केले आहे.
याप्रसंगी सोसायटीतील सर्व मान्यवर तसेच नातेवाईक मित्रमंडळी त्यांनी उपस्थिती दर्शवली. वाढदिवसा मध्ये ज्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये सर्व लहान मुला मुलींनी आणि मोठ्यांनी मनसोक्त आनंद लुटला.
या वाढदिवसाच्या कार्यक्रमांमध्ये विविध उपक्रम राबवून, तसेच लहान मुलांसाठी टॅटू काढण्यापासून,मॅजिक शो (प्रस्तुत करते नैतिक रसिक रायठाथा) शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम दहिसर शिव ओम हाऊसिंग सोसायटी याठिकाणी सोसायटीचे सचिव चित्रे साहेब,उपासने साहेब आणि सर्व सोसायटी सदस्य यांच्या सहकार्यामुळे अतिशय उत्कृष्ट पद्धतीने संपन्न झाला.जेवणाचे उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करून शाकाहारी, मांसाहारी अशा दोन्ही पद्धतीच्या लोकांसाठी नियोजनबद्ध संपन्न झाला.रविवारी वडिलांचा परतीचा प्रवास असून आई या महिना अखेर कामानिमित्त परदेशी प्रवास करणार असल्याचे समजले.