आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मुंबई:-कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कामकाजाचा राज्यपालांनी घेतला आढावा.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कामकाजाचा राज्यपालांनी घेतला आढावा.

मुंबई दि:
सातारा येथील बहुजनांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करणारे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ या राज्य सार्वजनिक विद्यापीठाच्या कामकाजाचा व प्रगतीचा विद्यापीठाचे कुलपती व महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सी.पी. राधाकृष्णन यांनी नुकताच मुंबई येथील राज भवन मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यापीठाचे कुलपती तथा महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन यांनी आढावा घेतला .
या आढावा बैठकी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठात सुरू असलेल्या नाविन्यपूर्ण पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम, मराठी भाषा व अन्य भारतीय भाषांचे शिक्षण , विद्यापीठातील विविध पायाभूत सेवा सुविधा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, गुणवत्ता सुधार, विद्यापीठाद्वारे राबविले जाणारे नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, कौशल्य विकास अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांसाठी कार्यानुभव देण्यासाठी करण्यात आलेली व्यवस्था याची जाणीवपूर्वक माहिती घेतली.
विद्यापीठात विदेशी भाषा प्रशिक्षण व्यवस्था, माजी विद्यार्थी संघटनांचा विद्यापीठ विकासात सहभाग, आदिवासी विद्यार्थ्यांचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढविणे, वसतिगृह सुविधा, क्रीडा विकास, नाविन्यपूर्ण उपक्रम याबाबत कुलपती व राज्यपाल श्री राधाकृष्णन यांनी आढावा घेतला. विद्यापीठाचे कुलाधिकारी श्री चंद्रकांत दळवी यांचे मार्गदर्शनाखाली विद्यापीठाद्वारे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जात असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी दिली.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाची स्थापना राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, भारत सरकार या अंतर्गत झालेली आहे . राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत विद्यापीठास ५५ कोटी रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. परंतु सदर निधी विद्यापीठास देण्यात आलेला नाही, सदर निधी विद्यापीठास मिळवून देण्यासाठी राज्यपाल कार्यालयाकडून विशेष प्रयत्न केले जातील अशी हमी देखील यावेळी कुलपती तथा राज्यपालांनी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या प्रमुखांना दिली. विद्यापीठाच्या घटक महाविद्यालयातील रिक्त जागांच्या भरतीचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहे . सदर रिक्त जागांची भरती करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची ग्वाही बैठकीला देण्यात आली.
सदर बैठकीला राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ ज्ञानदेव म्हस्के ,‌प्रभारी कुलसचिव प्रा डॉ विजय कुंभार व संचालक, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (आयक्यूएसी) प्रा डॉ. महेंद्र अहिरे, राज्यपाल कार्यालयातील अधिकारी श्री. विकास कुलकर्णी व श्री उमेश काशीकर हे उपस्थित होते.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

________________________________
फोटो- महाराष्ट्राचे राज्यपाल श्री सी.पी. राधाकृष्णन यांना माहिती देताना कर्मवीर विद्यापीठाचे प्रमुख

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button