ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
सातारा:-साताऱ्यात पत्रकारांना शासकीय बैठकीमध्ये उपस्थित राहण्याबाबत काही गैर नाही -जयकुमार गोरे.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
साताऱ्यात पत्रकारांना शासकीय बैठकीमध्ये उपस्थित राहण्याबाबत काही गैर नाही -जयकुमार गोरे.
सातारा दि: पत्रकाराच्या माध्यमातून खेड्यापाड्यातील परिस्थिती माहिती पडते. त्याबाबत उपाययोजना करणे सोपे जाते म्हणून शासकीय बैठकीमध्ये पत्रकारांना उपस्थित राहण्यासाठी काही गैर नाही असे भाजपचे मा ण- खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी स्पष्ट करून दुष्काळाबाबत शासन गंभीर आहे असे त्यांनी सांगितले .
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व पाणी टंचाई बाबत उपाययोजना केल्या जात असून ज्यांना पिण्याच्या पाण्याचे टँकर हवे आहेत व चारा छावणी हवे आहेत. त्यांच्यासाठी सकारात्मक रित्या शासन बघत आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही. असे आ .जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले या वेळेला भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, सुनिल काटकर, प्रविण धस्के, अमर तांगडे, भिमराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच भाजप सातारा लोकसभा मतदारसंघाचे समन्वयक पदी श्री सुनील काटकर यांची निवड केल्याबद्दल आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. भाजपच्या वतीने मध्य प्रदेश येथील पाटण विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रवासी विधायक म्हणून गेली दहा दिवस जयकुमार गोरे यांनी मध्य प्रदेशातील पाटन मतदारसंघांमध्ये भाजपचा प्रचार केला. या मतदार संघातील लोक सधन असून परदेशात निर्यात करणारे आहेत. येथील मांस व इतर वस्तू मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्याने हा परिसर सधन आहे. यातून नवीन गोष्टी शिकण्यास मिळाले असेही आमदार गोरे यांनी सांगितले.
——————————————
फोटो –