क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीराजकीय

म्हैसाळ येथे यात्रेनिमित्त व महिला दिनानिमित्त लोकनृत्य स्पर्धा व पारंपारिक वेशभूषा स्पर्धा संपन्न.

पत्रकार योगेश माने कोरेगाव तालुका अध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार योगेश माने कोरेगाव तालुका अध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

म्हैसाळ येथे यात्रेनिमित्त व महिला दिनानिमित्त लोकनृत्य स्पर्धा व पारंपारिक वेशभूषा स्पर्धा संपन्न.

म्हैसाळ : येथील कनकेश्वर यात्रेनिमित्त आयोजित लोकनृत्य स्पर्धेत मोरया ग्रुप सटवाई गल्ली यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देताना सरपंच रश्मी शिंदे-म्हैसाळकर.यावेळी उपसरपंच पद्मश्री पाटील, दुर्गादेवी शिंदे-म्हैसाळकर, गिरीजादेवी शिंदे-म्हैसाळकर, शोभा पाटील उपस्थित होते.

पारंपारिक वेषभूषा स्पर्धेत भाग्यश्री गयके यांची बाजी लोकनृत्य स्पर्धेत मोरया ग्रुप प्रथम : म्हैसाळ ला कनकेश्वर यात्रेनिमित्त आयोजन.

 

*म्हैसाळ* ता. १० : येथील कनकेश्वर देवाच्या यात्रा आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पारंपारिक वेशभूषा स्पर्धेत भाग्यश्री गयके यांनी बाजी मारत प्रथम क्रमांक मिळवला. त्यांनी हिरकणीची व्यक्तीरेखा सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. लोकनृत्य स्पर्धेत सटवाई गल्लीच्या मोरया ग्रुपने उत्कृष्ट सादरीकरण करीत प्रथम क्रमांक पटकावला. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याच्या संचालिका शोभा दिलीपकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.सरपंच रश्मी शिंदे-म्हैसाळकर, सुमनताई खाडे,उपसरपंच पद्मश्री पाटील, दुर्गादेवी शिंदे-म्हैसाळकर, गिरीजादेवी शिंदे-म्हैसाळकर, श्रृती पाटील प्रमुख उपस्थितीत होत्या.
यावेळी बोलताना सरपंच सौ. शिंदे म्हणाल्या की, महिलांच्या साठी विरंगळा व्हावा, शहरी भागाप्रमाणे आपल्या ग्रामीण भागातील महिलांना देखील लोकनृत्य आणि पारंपारिक वेशभूषा अशा स्पर्धेच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने यात्रा कमिटीच्या वतीने गावात प्रथमच अशा स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या.याला चांगला प्रतिसाद मिळाला.महिला धाडसी असतातच फक्त त्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असते.गावात महिलांच्यासाठीच अशा स्पर्धा घेतल्यामुळे महिला मोठ्या धाडसाने पुढे येण्यास सुरुवात झाल्याचे समाधान यावेळी सरपंच सौ.शिंदे यांनी व्यक्त केले. वेशभूषा स्पर्धेत स्वाती निकम दुसरा क्रमांक,सुश्मिता जाधव तिसरा क्रमांक तर रिटा कोरवी यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला.राधाबाई शिंदे गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी आणि जय मल्हार ग्रुप शिरढोण यांनी उत्कृष्ट लोकनृत्य सादर केले.यावेळी वनिता चव्हाण, कविता निकम, दिपाली घोरपडे, अनिता कोळी, आरती शेजवळकर, पुजा बेळवे, प्रियांका शिंदे, हेमा बेडगे, स्वाती खोत उपस्थित होत्या.निवेदक सुशांत जाधव यांनी सुत्रसंचालन केले.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

______________________________________

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button