श्रीरामपूर:-४० वर्षांच्या संघर्षानंतर साकारलं स्वप्र ! श्रीरामपूरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ! डोळ्यांचे पारणे फेडणारा कार्यक्रम झाला संपन्न.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

४० वर्षांच्या संघर्षानंतर साकारलं स्वप्र ! श्रीरामपूरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा !
डोळ्यांचे पारणे फेडणारा कार्यक्रम झाला संपन्न.

श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) ४० वर्षापासून श्रीरामपूरकरांची मागणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूड पुतळ्याचे अनावरण आज रविवार दि २ नोव्हेंबर रोजी उद्योग मंत्री उदय सावंत यांच्या हस्ते होत असून अध्यक्षस्थानी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित राहणार आहे या अनावरण सोहळ्याचे वैशिष्टय असे की . भव्य दिव्य असे व्यासपीठ उभारण्यात आले आहे .या ठिकाणी अहिल्यानगरच्या धर्तीवर फटाक्यांची आतिषबाजी होणार आहे सुमारे १०० ते १५० फुट क्रेनने लाईटच्या फोकसच्या झगमगाटामध्ये हा अनावरण सोहळा होणार आहे . सुमारे तासभर ही फटाक्यांची आतिषबाजी आणि हा भव्यदिव्य सोहळा होणार आहे श्रीरामपुरात आतापर्यंत एवढा मोठा दिमागदार सोहळा झालेला नाही असा सोहळा आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा आणि स्मारकाच्या लोकार्पणनिमित्त होणार असे तयारीवरून दिसून येते . हा सोहळा पाहण्यासाठी श्रीरामपुर शहरातील कानाकोपऱ्यातून तसेच श्रीरामपुर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे ‘ या अनावरण सोहळ्याची जय्यत तयारी गेल्या ८ दिवसांपासून सुरू आहे माजी खा डॉ सुजयदादा विखे पाटील यांनी स्वतः या कार्यक्रमाच्या नियोजनात व्यक्तीश लक्ष घातलेले आहे आज होणार हा लोकार्पण सोहळा शिवभक्ताच्या डोळ्याची पारणे फेडणारा ठरेल असे नियोजन संयोजकांनी केले होते.
तासभर चालणारा फटाक्याची आतिषबाजी ‘ लाईट शो ई. सारा परिसर दुमदुमला होता.




