सातारा :-वाईमध्ये भाजपा युवा मोर्चा कडून भव्य रक्तदान शिबिर संपन्न.
प्रतिनिधी वैष्णवी शिंदे :-9146802009

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
वाईमध्ये भाजपा युवा मोर्चा कडून भव्य रक्तदान शिबिर संपन्न.
वाई प्रतिनिधी
राष्ट्र नेता ते राष्ट्रपिता या भारतीय जनता पार्टीच्या सेवा पंधरवडा कार्यक्रम अंतर्गत वाई युवा मोर्चाच्या वतीने रविवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी कृष्णोत्सव मंगल कार्यालय वाई येथे रक्तदान शिबीर आयोजित केले होते. आजची युवा पिढीने विधायक मार्गाने सामाजिक कार्याचे व राष्ट्रहिताचे काम करावे हाच आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उद्देश आहे. माजी आमदार व विद्यमान महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य माननीय मदन दादा भोसले यांनी शिबिराचे उद्घाटन केले. याप्रसंगी वाई तालुकाध्यक्ष रोहिदास बापू पिसाळ, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस यशराज भोसले, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तेजस जमदाडे, वाई युवा मोर्चा कार्याध्यक्ष अथर्व पाटील,कामगार आघाडी जिल्हाप्रमुख अली आला,ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष सागर पवार,शहर वाहतूक आघाडी अध्यक्ष गुलाब डोंगरे,युवा शहराध्यक्ष श्रीरंग दिवेकर, युवा तालुकाध्यक्ष विक्रम शिंदे,केशव सूर्यवंशी,महिला मोर्चा तालुकाध्यक्ष दिपाली पिसाळ,वाई शहर सरचिटणीस सौ मनीषा घैसास तसेच अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते. या शिबिरात शहर व तालुक्यातून 72 रक्तदात्यांनी आपले कर्तव्य बजावले. यामध्ये महिलांनीही रक्तदान केले. वाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी भेट देऊन युवा पिढीचे कौतुक केले. जिल्हा उपाध्यक्ष तानाजी भिलारे, जिल्हा सरचिटणीस महेंद्र कुमार डुबल,जिल्हा चिटणीस यशवंत लेले तसेच वाई शहराध्यक्ष राकेश फुले, शहर सरचिटणीस श्री नरेंद्र महाजन, शहर उपाध्यक्षा सौ.सश्मिता जैन,चिटणीस श्री प्रसाद चरेगावकर, बेटी बचाओ बेटी पढाओ वाई शहर अध्यक्षा सारिका गवते यांनी या शिबिरास भेट दिली.हे शिबीर यशस्वी होण्यासाठी भारतीय जनता पार्टी वाई व युवा मोर्चा वाई यांनी अथक परिश्रम केले.