ताज्या घडामोडी

कालगाव:-(कराड)-सरकारची वचनपूर्ती….! सामान्यांच्या घराची स्वप्नपूर्ती…..!

पत्रकार सुशीलकुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार सुशीलकुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

सरकारची वचनपूर्ती….!
सामान्यांच्या घराची स्वप्नपूर्ती…..!

प्रधानमंत्री आवास योजना – घरकुल (2024-25)

सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण..🏘️

कालगाव गावातील सन २०१७ पासुन प्रतिक्षेत असलेली 28 जनांची प्रधानमंत्री घरकुल पात्र झाले बद्दल आज कालगाव ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेला कालगाव गावचे लोकनियुक्त सरपंच सोमनाथ चव्हाण भाऊ उपसरपंच योगेश चव्हाण ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र चव्हाण तसेच सचिव पदी असलेल्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली जगदाळे कालगाव ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते त्यांना आज प.स. गटविकास अधिकारी यांच्या मार्फत घरकुलाचा कार्यारंभ आदेश देण्यात आला. तसेच काहीजणांच्या खात्यावरती ऑनलाईन पद्धतीने पहिला हप्ता 15,000/- देखील जमा झालेत.गावातील सर्व लाभार्थ्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन.अनेक कुटुंबांच्या हक्काचे घराचं स्वप्न साकार करण्यासाठी ही योजना एक महत्त्वाचे पाऊल आहे. सरकारच्या या उपक्रमामुळे गरजू कुटुंबांना सुरक्षित आणि सन्मानाने जगता येईल.

आपल्या गावाच्या विकासासाठी आपण एकत्र येऊया आणि या योजनेचा योग्य लाभ घेऊया!

मौजे. कालगाव गावातील 50 घरकुल मंजूर केल्या बद्दल देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तसेच देशाचे गृह मंत्री अमित भाई शहा राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री .देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. श्री.अजितदादा पवार साहेब, ग्रामविकास मंत्री, मा. जयकुमार गोरे साहेब, पालकमंत्री मा.श्री.शंभुराज देसाई तसेच कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. मनोज दादा घोरपडे, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष मा. धैर्यशिल दादा कदम, किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस मा. रामकृष्ण वेताळ साहेब यांचे मनःपूर्वक आभार व या सर्वांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. तसेच कालगाव मध्ये मोदीजींनी पंतप्रधान घरकुल योजने अंतर्गत, घरकुल दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद मोदीजी म्हणून सर्व लाभार्थांकडुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवण्यात आलेत…
सर्व ग्रामस्थांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानले.

….. सर्व लाभार्थ्यांना भरभरून शुभेच्छा!

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

प्रधानमंत्रीआवासयोजना
घरकुल2024
शामगांव
स्वप्नांचेघर
विकासाच्या दिशेने

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button