ताज्या घडामोडी
श्रीरामपूर:-घराघरात शिवजयंती मनामनात शिवजयंती उत्साहात साजरी….
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
घराघरात शिवजयंती मनामनात शिवजयंती उत्साहात साजरी….

प्रसिद्ध गजलकार, कवी भिडेवाडाकार, संविधान दूत विजय वडवेराव पूणे, आयोजित देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियान – अंतर्गत उपक्रम – घराघरात शिवजयंती, मनामनात शिवजयंती, या नाविन्यपूर्ण उपक्रम भाग म्हणून ॲड .अण्णासाहेब मोहन यांच्या घरी शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंतीउत्साहात साजरी करण्याकरिता फुले प्रेमी समाज रत्न बाल शाहीर ओवी प्रसाद काळे व फुले प्रेमी कवी अँड. अण्णासाहेब भागवत मोहन श्रीरामपूर यांनी अहिल्यानगर उत्तर जिल्ह्यात पुढाकार घेतला. त्यांच्या मित्र परिवारातील व वैचारिक कार्यकर्त्यांनी शिवजयंती साजरी करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारीच क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन केले व शिवाजी महाराज यांच्या कार्याची ओळख करून दिली तसेच क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सन १८६९ मध्ये शोधून काढलीं आणि पुणे आणि किल्ले रायगड येथे १८७० मध्ये प्रथम शिवजयंती साजरी केली हा खरा इतिहास समजावून सांगितला. या कमी संविधान जागर अभियानाचे राजेंद्र हिवाळे सर, बोंबले नगर ,विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अमोल सोनवणे सर, बाजारतळ प्रभाग श्रीरामपूर, भारतीय बौद्ध महासभेचे संतोष बनसोडे सर, हरेगाव ,वंचित बहुजन आघाडीचे रमेश दिवे साहेब, ग्रामपंचायत कार्यालय कामगार संघटनेचे सचिव मा.सचिन भसाळे साहेब, सामाजिक कार्यकर्ते सतिष औताडे,सरालागाव, अण्णाभाऊ मुठे , मुठेवडगाव,धनवटे सर, अचानक नगर,डॉ.गौतम चित्ते, माळेवाडी, उपासक स्वराज मोहन, उपसीका सांची मोहन बाल शाहीर ओवी काळे हिचे पालक मा.प्रसाद काळे सर व सौ.वैशाली काळे मॅडम,सौ.सारिका मोहन मॅडम महिला बचत गटाच्या सीआरपी ताई ,इत्यादींनी विशेष परिश्रम घेऊन विविध भागात शिवजयंती साजरी केली.




