मायणी:-भारतमाता इंग्लिश मीडियम स्कूल च्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये उज्वल यश.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
भारतमाता इंग्लिश मीडियम स्कूल च्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये उज्वल यश.

भारतमाता इंग्लिश मिडियम स्कूल मायणीची विद्यार्थिंनी *कु.मनस्वी नवनाथ देशमुख*
वय वर्ष १२ हिने मुंबई जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये १९ वर्षाखालील क्रॉस कंट्री म्हणजेच पाच किलोमीटर व तीन किलोमीटर अशा दोन सामन्यात गोल्ड मेडल्स मिळवून १९ वर्षाखालील गटात पहिला क्रमांक मिळवला आणि विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली,सौ.सोनम नवनाथ देशमुख(पी.एस्.आय.मुंबई)यांची सुकन्या सहा महिन्यापूर्वी शिक्षणासाठी मुंबई या ठिकाणी आली असता तिची चिकाटी व जिद्द बघून मनस्वीच्या हायस्कूलच्या प्रिन्सिपल सौ.बने मॅम,क्रीडाशिक्षक श्री.स्वप्निल चव्हाण,श्री.एकनाथ परब यांनी तिच्या खेळासाठी खूप मेहनत घेतली…..
कु.मनस्वीच्या यशाबद्दल भारतमाता इंग्लिश मिडियम स्कूलच्या प्रिन्सिपल सौ.बागडे मॅडम,कमळेश्वर विद्यामंदिर विखळेचे क्रिडाशिक्षक श्री.एस्.एस्.पवार सर व मायणी ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




