फलटण:-कृतिशील सामाजिक काम करणाऱ्यांना महात्मा फुले नेहमीच प्रेरणादायी : डॉ सुरेश उबाळे.
प्रतिनिधी आशितोष चव्हाण महाराष्ट्र:-7447520147

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.
कृतिशील सामाजिक काम करणाऱ्यांना महात्मा फुले नेहमीच प्रेरणादायी : डॉ सुरेश उबाळे
सुजन फाउंडेशन च्या पुरस्कारांचे पुणे येथे वितरण
फलटण / पुणे
कृतिशील सामाजिक कार्याचे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले नेहमीच आद्यप्रेरणा स्रोत राहिले आहेत . महात्मा फुले हे कर्ते सुधारक होते जगाला सत्यशोधक विचारांची ओळख करून देऊन सत्यशोधक पद्धतीने जीवन जगणे ही मानवतेच्या दृष्टीने किती गरजेचे आहे हे महात्मा फुले यांनी प्रत्यक्ष कृतिशील कार्य करून सांगितले त्यांच्या विचारांची आज अधिक गरज आहे व त्या दृष्टीने सुजन फाउंडेशन समाजातील कर्त्या सामाजिक कार्यकर्त्यांना युवा गौरव व सामाजिक पुरस्कार देऊन प्रेरणा देत आहे असे मत कृषि संशोधक डॉ सुरेश उबाळे यांनी स्वारगेट पुणे येथे पुरस्कार वितरण सोहळ्याच्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना स्पष्ट केले
छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमास सुरवात झाली अध्यक्ष स्थानावरून बोलताना रघुनाथ ढोक यांनी सत्यशोधक विवाह पद्धतीने विवाह तसेच इतर सार्वजनिक कार्यक्रम करून या महात्मा फुले यांच्या विचारांना पुढे नेण्याचे काम आजच्या तरुणांनी करावे पालकांनी रूढी परंपरांना फाटा देत सत्यशोधक पद्धतीचा अवलंब करावा असे आवाहन त्यांनी या वेळी केले
पुणे येथे कॉलेजचे प्राचार्य मेजर थॉमसकॅंडी यांनी ब्रिटिश सरकारच्या वतीने महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन, महात्मा फुले यांचा पुणे विश्रामबाग येथे सरदार व प्रमुख लोकांच्या उपस्थितीत दिनांक १६ नोव्हेंबर १८५२ रोजी शालजोडी देऊन सत्कार केला या दिनाच्या १७० व्या संस्मरणीय दिनाचे औचित्य.सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर सुवर्ण महोत्सव वर्ष, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शकोत्तर रौप्य महोत्सव स्मृती वर्ष, राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्ष आणि स्वातंत्र्यचा अमृत महोत्सव वर्षा निमित्ताने सामाजिक ,विधायक, शैक्षणिक, राजकिय तसेच विविध क्षेत्रातील विशेष उल्लेखणीय कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या कार्याचा गौरव म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.
या वेळी प्रमुख उपस्थितीत प्रा.अमृतराव काळोखे पीएम पीएल राष्ट्रवादी कामगार युनियनचे सरचिटणीस सुनीलभाऊ नलवडे, सौ रोहिणी रासकर सामाजिक कार्यकर्त्या , सौ उमा रासकर, सौ सुनीता भगत , प्रावीण महाजन , अध्यक्ष युवकमित्र परिवार , उपाध्यक्ष हरीश ओव्हाळ, कामगार नेते उत्तम मोरे,कामगार नेते राजाभाऊ पायगुडे उपस्थित होते.
सुजन फौंडेशनच्या महात्मा फुले विचार अभियान या उपक्रमा अंतर्गत कामगार नेते मा कैलासआण्णा पासलकर पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते श्री नितिन सदाशिव बोराटे यांना महात्मा फुले सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
सत्यशोधक विवाह दाम्पत्य सौ हर्षदा व शेखर मगर यांना महात्मा फुले सत्यशोधक पुरस्काराने सन्मानित केले .पीएमपील कामगार संघटना नेते मा दिपकभाऊ गायवाड, श्री मृणाल ढोले पाटील श्री सचिन म्हसे वारजे माळवाडी पुणे, पिंपळे गुरव येथील समाजसेविका अदिती निकम यांना महात्मा फुले युवा गौरव सन्मानाने सन्मानित करण्यात येत आहे.
याप्रसंगी सौ पल्लवी मारकड,सौ गौरी पिंगळे, सौ सपना माळी,अलका गुंजाळ, डॉ प्रमिला तलवाडकर,विश्वनाथ गायकवाड , कुंदन काळे,
कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न करण्यासाठी महात्मा फुले विचार अभियान संयोजक विकास शिंदे आणि पी एम पीएल राष्ट्रवादी कामगार युनियन संघटनेचे सहकार्य लाभले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री योगेश चौधरी यांनी केले ,
आभार उत्तमराव मोरे यांनी मानले.