फलटण:-फलटणला सलग चौथ्या वर्षी खोखो चे विजेतेपद जि प शाळा चौधरवाडी चे यश.
सह संपादक स्वाती चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS
फलटणला सलग चौथ्या वर्षी खोखो चे विजेतेपद
जि प शाळा चौधरवाडी चे यश.
फलटण :
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण बाल क्रिडा जिल्हास्तरीय स्पर्धा शाहू स्टेडियम सातारा या ठिकाणी पार पडली. तालुकास्तरावर खो खो क्रीडा प्रकारात मुले आणि मुली गटाच्या संघाने प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्याचे नेतृत्व करत असताना २४ डिसेंबरला झालेल्या खो खो स्पर्धेत चौधरवाडी शाळेच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक,मुलांच्या संघाने गटांनी द्वितीय क्रमांक मिळवला आहे फलटण तालुक्याचे परंपरा जपत सलग चार वर्षे तालुक्याला विजेतेपद मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद शाळा चौधरवाडीच मोठ नेतृत्व लाभले. चौधरवाडी शाळेने ही सलग चार वर्षे खो खो ची परंपरा कायम ठेवली आहे.
यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शैक्षणिक व सामाजिक विचारमंच चौधरवाडी यांच्या माध्यमातून क्रीडा विभागाचे मार्गदर्शन जिल्हा परिषद शाळेला लाभले. क्रांतिज्योती क्रिडा मंडळाचे नेतृत्व नेतृत्व करत शाळेचे विध्यार्थी विविध प्रकारच्या क्रीडा क्षेत्रात जिल्हा, विभाग, राज्य यावर नेतृत्व करताना दिसत आहेत. या यशासाठी विचार मंच चे अध्यक्ष तुकाराम कोकाटे ,उपाध्यक्ष.उपाध्यक्ष भोसले सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ, शाळेचे शिक्षक यांनी मुलांचे कौतुक करून अभिनंदन केले. तसेच जिल्हास्तरावर सहकार्य करणारे फलटण तालुका क्रीडा समन्वयक, सर्व पदाधिकारी, शालेय शिक्षक वृंद आणि विचारमंच सदस्य यांचे विद्यार्थ्यांनी आभार मानले.