कोरेगावात प्रांत व तहसील कार्यालयाला संविधानाबाबत विचारला जाब….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
कोरेगावात प्रांत व तहसील कार्यालयाला संविधानाबाबत विचारला जाब….
कोरेगाव दि: भारत देश हा संविधानावर चालतो. कुणाच्या मेहरबानी वर नव्हे. याची जाणीव करून देण्यासाठी आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी राज्य उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे यांनी कोरेगाव प्रांत व तहसील कार्यालयात संविधान उद्देशिका व राजमुद्राबाबत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला.
याबाबत माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील प्रांत व तहसील कार्यालयामध्ये नव्याने फर्निचर बसविण्यात आलेले आहे. कोरेगाव तालुक्यातील अनेक अधिकारी वर्ग तसेच ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने शासकीय कामासाठी या कार्यालयात येतात. परंतु, गेल्या तीन महिन्यापासून या कार्यालयावर लावण्यात आलेली राजमुद्रा पडली आहे. संविधान उद्देशिका नसल्यामुळे कोरेगावात शासकीय कार्यालयात संविधान मानत नाहीत का? असा सवाल काही ग्रामस्थांनी उपस्थित केला. याची दखल घेऊन पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने राज्य उपाध्यक्ष श्री रमेश अनिल उबाळे यांनी थेट प्रांत कार्यालयात जाऊन याबाबत सुधारणा करावी .अन्यथा आंदोलन करावे लागेल. असाही इशारा दिलेला आहे.
वास्तविक पाहता गेले तीन महिन्यापासून प्रांत व तहसील तसेच इतर अधिकारी वर्ग या कार्यालयात ये जा करतात .नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी मध्ये संविधानाचे स्मरण करण्यात आले. परंतु दुर्दैवाने सातारा जिल्ह्यातील चार मंत्री असताना सुद्धा कोरेगाव तालुक्यातील प्रांत व तहसील कार्यालयात गेली चार महिन्यापासून संविधान उद्देशिका व राजमुद्रा दुर्लक्षित होत आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून याची दखल उभ्या महाराष्ट्राने घ्यावी.
जर दोन दिवसांमध्ये यामध्ये सुधारणा न केल्यास या कार्याला टाळे ठोकून तीव्र आंदोलन केले जाईल. जे अधिकारी संविधान उद्देशिका मानत नाहीत. त्यांच्या सर्वच कामकाजाची चौकशी करून त्यांना हुकूमशाही किंवा एकादीकारीशाही जर आवडत असेल तर त्यांनी त्यांच्या नियमाप्रमाणेच काम करावे. असेही काही ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, याबाबत तांत्रिक मुद्दा न उपस्थित करता लवकरात लवकर सुधारणा केली जाईल असे काही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संविधानाबाबत गळा काढणाऱ्यांना या बाबीची जाणीव कशी काय झाली नाही? याबाबत हे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
—————————————–
फोटो पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयात जाब विचारताना रमेश उबाळे (छाया- अजित जगताप, कोरेगाव)