आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा नगरपालिकेच्या वतीने तीस हजार वृक्ष लागवडीचे मोहीम.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

सातारा नगरपालिकेच्या वतीने तीस हजार वृक्ष लागवडीचे मोहीम.

सातारा दि: सातारा नगरपालिकेच्या वतीने हरितक्रांती घडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू झालेले आहेत. त्याचाच भाग म्हणून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सातारा शहरालगत तीस हजार विविध जातीच्या वृक्षाचे लागवड करण्याची मोहीम हाती घेतली आहे. सातारा नगरपालिकेचे मुख्यधिकारी अभिजीत बापट व विविध खात्याचे प्रमुख तथा कर्मचारी यांच्या सहकार्याने भैरोबाचा डोंगर या ठिकाणी पंधरा हजार व इतर ठिकाणी मोकळ्या जागेत पंधरा हजार असे मिळून तीस हजार वृक्षारोपण करण्यात येणार आहे. सध्या खड्डे काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. भर उन्हाळ्यात आतापर्यंत बाराशे ते तेराशे खड्डे खणून झालेले आहेत. येत्या आठ दिवसात उर्वरित खड्डे खोदून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाच्या आगमनासोबतच या वृक्षाची लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये भावा पाच पेट, आपटा फोनचाफा ,पिवळा चाफा, मिचेलियाचा पाक, कांचन, बॉटल ब्रश, पारिजात, कैलास पत्ती, बेल, बकुळा, बूत ,कदम, बुडखेरी, चिंच, गोरख चिंच, आवळा, जांभूळ, विलायती चिंच, बोर, बोकर, कडूलिंब, महागुनी, अर्जुन, तोबाई ,पिंपळ, आंबा, फणस, नारळ, निम, कुसुम, रानभेंडी, त्याचबरोबर इतर गुणकारी व औषधी तसेच फळ देणाऱ्या रोपांची लागवड केली जाणार आहे. याचबरोबर या रोपांची निगा राखण्याची जबाबदारी सातारा नगरपालिका पार पाडणार आहे.
सातारा शहरातील तापमान नियंत्रण ठेवण्यासाठी वृक्ष लागवड गरजेचे आहे. यासाठी वृक्षप्रेमी प्रयत्न करत आहेत.
ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button