नांदेड:-समाज शिरोमणी पुरस्काराने देगलूर येथे रघुनाथ ढोक होणार सन्मानित. !!!
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
समाज शिरोमणी पुरस्काराने देगलूर येथे रघुनाथ ढोक होणार सन्मानित!!!

पुणे/नांदेड: प्रज्ञा बहुउद्धेशीय संस्था , अकोला ,महाराष्ट्र तर्फे 13 वे राज्यस्तरीय मराठी साहित्य समेलन ,देगलूर – 2025 रविवार दि.5 ऑक्टोंबर 25 रोजी सिद्वेश्वर लॉन्स ,देगलूर जि.नांदेड येथे सकाळी 10 ते सायं.5.30 पर्यंत आयोजित केलेले आहे.या संमेलनात पुणे येथील समाजसेवक रघुनाथ ढोक यांना समाज शिरोमणी पुरस्कार-2025 मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी संस्थापक जेष्ठ लेखिका ,कवियत्री सौ.लीनाताई देगलूरकर ,संमेलनाध्यक्ष म्हणून परभणीच्या डॉ.संगीता आवचार, आयोजक मा.अनिल कुलकर्णी ,स्वागताध्यक्ष ह.भ.प.राजेश महाराज देगलूरकर ,उद्घाटक किशोरकुमार मिश्रा,शेगाव ,कवी संमेलनाध्यक्ष डॉ.सुधाकर बेंद्रे, सातारा , गझलमुशायरा अध्यक्ष मा.रविंद्र यशवंतराव,डोंबिवली , मकरंद घाणेकर ,पुणे आणि प्रमुख अतिथी म्हणून डॉ.दिलीप नेवसे ,सातारा ,डॉ.शैलेंद्र भणगे,छ.संभाजीनगर व समन्वयक बालाजी ढगे ,देगलूर उपस्थितीत रहाणार आहे.
श्री .रघुनाथ ढोक यांना पुरस्कार देण्याचे कारण म्हणजे या आधुनिक काळात व विज्ञानयुगात सर्व गोष्टीची सत्यता कळून देखील सर्व जाती धर्मातील लोक व मोठ्या संखेने बहुजन समाज घरातील सर्व कार्यासाठी पंचांग , मुहुर्थ , अंधश्रद्धा आणि कर्मकांड पाहून विधी कार्य पार पाडत आहेत. त्यामुळे त्याचे प्रस्थ मोठे निर्माण झालेले आहे. त्यातून लोकांचे मोठे आर्थिक नुकसान व नाहक वेळ वाया जात असताना देखील अनेक अनर्थ घडत आहेत. अशा परीस्थितीत सत्यावर आधारित असलेले व महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या सत्यशोधक विवाह पद्धतीचे कार्य तसेच गृहप्रवेश / वास्तू सोहळे व इतर कार्ये महाराष्ट्र व इतर राज्यात जावून सत्यशोधक ढोक हे गेले अनेक वर्ष मोफत कार्य करीत आहेत.त्यांचेमुळे सत्यशोधक चळवळीस पुन्हा एकदा पुनर्जिवन मिळाले असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. सोबत त्यांनचे साहित्य क्षेत्रात देखील भरीव योगदान आहे.आज सत्यशोधक पद्धतीचे कार्य मोठ्या प्रमाणात होणे या काळाची नितांत गरज आहे.
सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी गेल्या पाच वर्षात महाराष्ट्र व तेलगांना राज्यात सत्यशोधक विवाह एकूण 53 आणि 15 गृहप्रवेश / वास्तू सोहळे व इतर सत्यशोधक विधी कार्य मोफत विधीकर्ते म्हणून अनेक महापुर्षांचे जयंतीदिनी , स्मृतिदिनी व महनीय दिनी विधीकार्य पार पाडले असून अनेक प्रथम स्मृतिदिनानिमित नातेवाईक व स्वतःचे आई वडील यांचे प्रबोधनात्मक कृतीशील सामजिक उपक्रम राबवून कार्यक्रम यशस्वी केले आहेत. त्यांनी सर्व जाती धर्माचे पुनर्विवाह मेळावे देखील मोफत भरवून अनेकांचे लग्न जुळविले असून लावले देखील आहेत. ते पुणे येथील पुणे विध्यार्थी गृहाच्या इंजि.कॉलेज मध्ये लिपीक पदाची नोकरी संभाळून सामाजिक ,शैक्षणिक व सहकार क्षेत्रात गेली 34 वर्षे कार्यरत असताना देखील त्यांनी विद्येची अधिष्ठात्री सावित्रीबाई फुले , ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मराठी,हिंदी ,इंग्रजी व जर्मन फोर कलर व दिनांची साउली, महात्मा फुले गीत चरित्र व इतर पुस्तके प्रकशित केलेली आहेत.




