राहाता:-दुग्धयोगी रावसाहेब नाथाजी म्हसके यांचा रविवारी सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा.
पत्रकार आदिनाथ कडू राहता तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
दुग्धयोगी रावसाहेब नाथाजी म्हसके यांचा रविवारी सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा.

राहाता :– बाभलेश्वर
श्रीरामपुर : सहकार, शिक्षण व शेती व दुग्ध क्षेत्रातील प्रभावी कार्याचा ठसा उमटविणारे दुग्धयोगी रावसाहेब नाथाजी पाटील मस्के यांच्या प्रेरणादायी कार्यावर आधारित ‘शरदपर्व– सारथी अमृतरथाचे’ या ग्रंथाचे प्रकाशन आणि स्व. नाथाजी पाटील म्हस्के यांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळा व रावसाहेब नाथाजी पा.म्हस्के यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता बाबळेश्वर येथे भव्यदिव्य रित्या पार पडणार आहे.
या सोहळ्यात ‘शरदपर्व– सारथी अमृतरथाचे’ या ग्रंथाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री पद्मभूषण शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या हस्ते होणारा असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात भूषविणार आहेत.
प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील अनेक मान्यवर सहकार चळवळीतील नेते, शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते व सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
‘शरदपर्व–अमृतरथाचे’ या ग्रंथाचे लेखन डॉ. मोहनराव सांगळे यांनी केले आहे. रावसाहेब मस्के यांच्या सहकार, शिक्षण आणि ग्रामीण विकासासाठी बहुआपामी कार्याचे संजीव चित्रण या ग्रंथातून उलगडले आहे.
रावसाहेब मस्के यांनी १९८० साली श्रीरामपूर दूध संघाचे संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारताच संघाच्या विकासासाठी अनेक दूरदर्शी निर्णय घेतले. त्यांच्या पुढाकाराने १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून दूध संघाची आधुनिक इमारत उभारण्यात आली. तसेच बर्फ कारखाना, पशुधन प्रयोगशाळा, सीमन्स युनिट आणि पर्यवेक्षक प्रशिक्षण कोर्स सुरू करून दुग्ध उद्योगाला नवे बळ दिले.
सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना राज्यस्तरीय ‘दुग्धयोगी’ सन्मान प्राप्त झाला आहे.
रावसाहेब म्हस्के यांनी सहकार चळवळीला ग्रामीण विकासाची दिशा दिली. त्यांच्या कार्यातून प्रेरणादायी आदर्श उभा राहिला आहे. ‘शरदपर्व–सारथी अमृतरथाचे’ हा ग्रंथ भावी पिढीसाठी ऊर्जास्तोत्र ठरेल, असे मत सहकार क्षेत्रातील नेत्यांनी व्यक्त केले आहे. रावसाहेब मस्के यांच्या या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याबाबत बाबळेश्वर व परिसरात उत्सुकतेचे वातावरण आहे. या कार्यक्रमासाठी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सहकारी क्षेत्रातील इच्छुकांनी या समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन गौरव समितीचे अध्यक्ष माजी आमदार दादाभाऊ कळमकर व सुधीर मस्के यांनी केले आहे.




