सातारा:-अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन.
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा संघटक
RPS STAR NEWS
अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन.
सातारा, दि.30 :- कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या लाभासाठी अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील शेतकऱ्यांनी 10 डिसेंबरपर्यंत https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.
कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत काढणीत्तोर व्यवस्थापन घटकांतर्गत फळे पिकविण्यासाठी रायपनिंग चेंबर, उत्पादित मालाच्या साठवणुकीसाठी पुर्वशितकरण गृह उभारणे, प्राथमिक / फिरते प्रक्रिया केंद्र, शितगृह, शितवाहन याशिवाय फलोत्पादन यांत्रीकीकरण घटकांतर्गत मजूर टंचाईवर मात करणेसाठी ट्रॅक्टर, पॉवर टिलर, तसेच पिक संरक्षण औजारे, शेततळे अस्तरीकरण, सामुहिक तलाव योजना, हरीतगृह उभारणी, शेडनेट हाऊस, मल्चिंग, कांदा चाळ उभारणी, क्षेत्र विस्तार घटकांतर्गत आले, हळद, ड्रॅगन फ्रूट, ब्ल्यु बेरी लागवड अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका, तसेच डाळिंब पिकासाठी अॅटी हेलनेट, द्राक्ष पिकाकरीता क्रॉप कव्हर इत्यादी बाबींचा अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे.