कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

श्रीरामपुर तालुक्यातील हरेगावात जागतिक दर्जाचा इंधन प्रकल्प होणार –  ४ हजार एकर जमिनीचा वापर / गती देण्यासाठी बावनकुळेंच्या अध्यक्षतेत समिती.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

श्रीरामपुर तालुक्यातील हरेगावात जागतिक दर्जाचा इंधन प्रकल्प होणार –  ४ हजार एकर जमिनीचा वापर / गती देण्यासाठी बावनकुळेंच्या अध्यक्षतेत समिती.

श्रीरामपुर / माळेवाडी ( RPs स्टार न्युज प्रतिनिधी ) अहमदनगर जिल्ह्यातील हरेगाव येथे महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या ४ हजार एकर जमिनीवर जागतिक दर्जाचा शाश्वत विमान इंधन ( निगेटिव्ह नेट झिरो इंधन ) प्रकल्प उभारला जाणार आहे या भव्य प्रकल्पाला जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया राबविण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय मंत्रिमंडळ उपसमितीची स्थापन केली आहे मुंबईतील ‘ झेटआरटु ग्रुप हेल्डिंग्स लि ‘ या कंपनीमार्फत हा प्रकल्प साकारला जाणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या ३१ डिसेंबर २०२५ रोजीच्या बैठकी विमान वाहतूकीसाठी लागणारे शाश्वत इंधन तयार करणाऱ्या प्रकल्पावर सविस्तर चर्चा करण्यात आली ही त्यानंतर आता या निर्णयाला गती देण्यासाठी एका उच्चस्तरीय सामितीची स्थापना करण्यात आली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बाबनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांचा समावेश आहे या प्रकल्पासाठी शेती महामंडळाची जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे ( एमआयडीसी ) वर्ग केली जाईल सुरुवातीला ही जमीन ४९ वर्षांच्या दीर्घ मुदतीसाठी भाडेतत्त्वावर दिली जाणार असून पुढील ४९ वर्षांसाठी नुतनीकरणाची तरतूदही प्रस्तावात करण्यात आली आहे अशा प्रकारे एकुण १८ वर्षांच्या कालावधीसाठी या जमिनीचा वापर प्रकल्पासाठी होऊ शकतो.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button