वाई:-‘किसन वीर’ च्या स्वयंसेवकांची वाईत मानवी साखळी-“मतदार जागृतीनिमित्त कार्यक्रम” मतदान हा अधिकार – प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे
पत्रकार वैष्णवी शिंदे

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे
RPS STAR NEWS
वाई:-‘किसन वीर’ च्या स्वयंसेवकांची वाईत मानवी साखळी-“मतदार जागृतीनिमित्त कार्यक्रम” मतदान हा अधिकार – प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे
लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो. नवमतदारांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता मतदान करावे, कारण आपले मत हा आपला अधिकार आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने आयोजित केलेल्या मतदार जागृतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात, डॉ. अंबादास सकट, एन. एस. एस.चे सदस्य डॉ. संदीप वाटेगावकर, सोमिनाथ सानप यांची उपस्थिती होती.
डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, एन. एस. एस.चे स्वयंसेवक महाविद्यालयातील उत्साही विद्यार्थी असतात. तुम्ही स्वयंसेवक कॉलेजला समाजाशी जोडणारे आहात. तुम्ही मनात आणले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मत देणे ही ‘दान’ करण्याची प्रक्रिया आहे, आणि ‘दान’ कधीही विकले जात नाही. त्यामुळे या राष्ट्रीय उत्सवात तुम्ही सहभागी व्हा. तुमच्या गावातील प्रत्येक मतदाराला तुम्ही मतदानासाठी प्रवृत्त करू शकता. भारतीय लोकशाही बळकट करण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता. प्रत्येक स्वयंसेवकाने पाच – पाच मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त केले, तरी मोठे राष्ट्रीय काम होऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्वेता शिंदे व साक्षी नरुटे या स्वयंसेवकांनी लाँच केलेल्या एन. एस. एस. च्या युट्युब व इंस्टाग्रामचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांच्या शुभहस्ते उद्॒घाटन झाले. यानंतर स्वयंसेवकांनी wai vote अशी मानवी साखळी करून मतदार जागृती केली. या राष्ट्रीय व समाजोपयोगी कामातून समाधान मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली.
कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संदीप वाटेगावकर यांनी सुत्रसंचालन केले. डॉ. अंबादास सकट यांनी आभार मानले. सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाचे मार्गदर्शन विशाल महांगडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमास वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील एन.एस. एस. चे स्वयंसेवक उपस्थित होते.