क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरेगाव:-चोरीस गेलेल्या दागिन्याचा गुन्हा उघड करुन पोलिसांनी आरोपीकडून केले ते जप्त ,,,

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

चोरीस गेलेल्या दागिन्याचा गुन्हा उघड करुन पोलिसांनी आरोपीकडून केले ते जप्त ,,,

पिंपोडे बु ॥ ( दिगंबर नाचन): कोरेगाव तालुक्यातील बाजार पेठ असलेल्या वाठार पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे कवडेवाडी येथील फिर्यादी सौ. मनिषा उदय जगदाळे यांची सासु मयत झाली होती.त्यांचा अंत्यविधी साठी सातारा येथुन कवडेवाडी येथे रिक्षाने आले होते. यावेळी गळ्यातील सोन्याचे सात तोळे वजनाचे दागीने त्यांच्या मालकीच्या रिक्षाच्या सिट खाली पर्समध्ये ठेवले होते. अंत्यविधी उरकून परत आल्यानंतर त्यांचे दागीने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची माहिती समजली.
फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी स्थानिक पातळीवर चौकशी केली पण , दागिने आढळून आले नाही. त्यामुळे वाठर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा रजि नं २३६ / २०२३ भादवि कलम ३७९ प्रमाणे तक्रार दाखल केली
होती. सदर गुन्ह्याची तक्रार दाखल झाल्यानंतर गुन्ह्याचे अनुषंगाने श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापु बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री. राजेंद्र शेळके उप-विभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव यांनी गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा व गेले मुद्देमालाचा तात्काळ शोध घेणेबाबत वाठार पोलिसांना सूचना दिल्या.
वाठार पोलीस स्टेशन येथे नव्याने दाखल झालेले प्रभारी अधिकारी स.पो.नि. श्री शिवाजी भोसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्री. संदिप बनकर, पोलीस हवालदार उदय जाधव, पोलीस अंमलदार प्रशांत गोरे, गणेश इथापे यांनी गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा गोपनीय बातमीदारामार्फत शोध घेतला .संशयीत आरोपी सुहास धनाजी फडतरे वय २९ रा. देगाव पाटेश्वर जि सातारा सध्या रा. कवडेवाडी ता कोरेगाव यास चौकशी साठी ताब्यात घेतले. गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली .त्यास गुन्ह्यात अटक करुन चोरी केलेले गुन्ह्यातील एकुण तीन लाख साठ हजार रुपये किंमतीचे सात तोळे वजनाचे सोन्याचे सर्व दागीने अटक आरोपी कडुन जप्त करण्यात आले.. नमुद गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार उदय जाधव हे करीत आहेत. सदर कारवाईत सहभागी सर्व अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा व श्री. बापु बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे
—————————————————————–
फोटो- सोन्याच्या दागिन्यांच्या सोबत आरोपी व कर्तव्यदक्ष वाठार स्टेशन पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी (छाया- अजित जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button