ताज्या घडामोडी

केळघर:-निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनाच्या मोठेपणाने प्रचाराला गती

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनाच्या मोठेपणाने प्रचाराला गती

केळघर दि: सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली असून शक्ती प्रदर्शन झाले आहे. यामध्ये निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनाच्या मोठेपणाने सातारा- जावळी मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार श्री अमित कदम यांच्या प्रचारासाठी आता ग्रामीण भागात चांगलीच गती आल्याचे चित्र दिसू लागलेले आहे.
लोकशाहीमध्ये प्रत्येकांना आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. हा अधिकार अबाधित राखण्याचे काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून केले जात आहे. आणि त्याचे स्वागतही करण्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते कमीपणा मानत नाहीत. एकापेक्षा अनेक उमेदवारी अर्ज दाखल करणे हे जिवंत लोकशाहीची लक्षणे आहेत . त्याच पक्षातील इतरांनी अर्ज दाखल करणे असा आहे. परंतु, सातारा- जावळी मतदारसंघात शिवसेना वगळता इतर कोणत्याही पक्षांमध्ये प्रस्थापितांच्या विरोधात अर्ज दाखल करण्याचे स्वतंत्र त्या पक्षातील कार्यकर्त्यांना नसल्याचे मतदारांनी पाहिलेले आहे.
शिवसेनाप्रमुख आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली. त्यावेळेला राष्ट्रीय काँग्रेसचे वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील व ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते. छत्रपतींच्या मावळ्यांचा बालेकिल्ला म्हणून जावळी खोऱ्याकडे पाहिले जाते. याच जावळी खोऱ्याने १९९५ साली पश्चिम महाराष्ट्रात भगवा फडकवून जावळीकरांच्या स्वाभिमानाची ज्योत पेटवली. आज जावळीकरांनी हाती मशाल घेऊन क्रांती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील, माजी आमदार सदाशिव सपकाळ, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, हणमंतराव चवरे – पाटील , बबन धनावडे, विजय शिंदे , धनंजय चव्हाण,राष्ट्रीय काँग्रेसचे जावळी तालुकाध्यक्ष संदीप माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सुरेश पाटे,शिवाजी जाधव , सुभाष कदम, अशोक परामणे, विठ्ठल चव्हाण, प्रदीप पवार यांच्यासह खेड्यापाड्यातील मागासवर्गीय, अल्पसंख्यांक व मराठा आरक्षणासाठी महायुतीच्या भूलथापा ऐकून वैतागलेला मराठा युवक आणि शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, महिला बचत गटाच्या स्वयंसेविका उस्फूर्तपणाने खेड्यापाड्यात जाऊन ” चिन्हाचा प्रचार करून जनजागृती करत आहेत.
सातारा जावळी मतदार संघातील मतदारांची यादी म्हणजे खऱ्या अर्थाने परिवर्तन करणारे अध्याय असल्याची महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सुचित केले जात आहे. सातारा तालुक्यातील परळी, शेंद्रे, सातारा शहर व परिसरातील ग्रामीण भागात कोंडवे, वेळे कामथी, सायली कण्हेर, चिंचणी, किडगाव, कलंभे, सारखळ, गवळी, गजवडी, आष्टे, मांडवे, वेचले व परिसरात ग्रामस्थांसह मतदार सुद्धा उघडपणाने मशालीचा प्रचार करत आहेत. जावळी तालुक्यातील मेढा, सायगाव, आनेवाडी, खर्ची तर्फ कुडाळ, सावली, रांनगेघर, कावडी, सलपाने, दापवडी , वहागाव, केळघर, कुसुंबी, मांटीमुरा, सायगाव, मोरघर, आंबेघर, कुसुंबी , गांजे, मोहट, करंजे येथील बहुतांश निष्ठावंत शिवसैनिकांची नाराजी दूर झालेली आहे. शिवसेना कार्याध्यक्ष व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निष्ठावंत शिवसैनिक मशाली व्यतिरिक्त कोणत्याही चिन्हाचा विचार करत नाहीत. त्यामुळे भविष्यात सर्वाधिक मतदान महाविकास आघाडी साठी व्हावे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिक कामाला लागलेले आहेत.
या निवडणुकीत बोगस मतदान करण्याचा पांयडा बंद करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी बोलून दाखवला आहे. महाविकास आघाडीच्या प्रयत्नाला यश आले असून ज्या शिवसैनिकांनी मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे. त्यांचा पक्षश्रेष्ठींनी निश्चितच गौरव करावा. यासाठी आता स्वतः महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री अमित कदम हेच पुढाकार घेतील. असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे……………
फोटो- महाविकास आघाडीचे उमेदवार श्री कदम यांच्या प्रचार निमित्त मार्गदर्शन करताना शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानगुडे पाटील, माजी आ. सपकाळ, जिल्हाप्रमुख सचिन मोहिते व मान्यवर (छाया- अजित जगताप, सातारा)

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button