ताज्या घडामोडी

सातारा:-लाडकी बहीण मेसेजने सातारा जि.प.व काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

लाडकी बहीण मेसेजने सातारा जि. प. व काँग्रेस पदाधिकाऱ्यांमध्ये जुंपली…

सातारा दि: महाराष्ट्र शासनाच्या महायुतीने मोठा गाजावाजा करून लाडकी बहीण योजना आणलेली आहे. या योजनेतून दरमहा प्रत्येकी दीड हजार रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होत आहेत . आता ही रक्कम सातारा जिल्ह्यात एका पुरुषाच्या खात्यात जमा झाल्याचा मोबाईल यंत्रणेत मेसेज आल्याने खळबळ माजली. या प्रकाराची चौकशी करण्यात येणार असून संबंधित काँग्रेसच्या पदाधिकारी असलेल्या नरेद देसाई यांना जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत नोटीस पाठवली आहे.
याबाबत माहिती अशी की , सातारा जिल्ह्यात महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यात दिनांक २८ जून पासून लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे .त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने कागदपत्राची पूर्तता करून अर्ज दाखल केलेले आहेत. या अर्जाची छाननी केल्यानंतर प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा होत आहेत. यापूर्वी खटाव तालुक्यामध्ये एका महिलेच्या नावाने अनेक आधार कार्ड द्वारे अर्ज आल्या आणि सदरच्या माहितीमुळे खळबळ माजली होती. आरोपींना अटक सुद्धा करण्यात आली होती. पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यातील दुसरा प्रकार घडलेला आहे.
सातारा जिल्ह्यात आय.सी.आय.सी. बँकेचे पूर्वी खातेदार असलेले व राष्ट्रवादी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हा सरचिटणीस नरेश विठ्ठल देसाई यांना त्यांच्या खात्यामध्ये दीड हजार व तीन हजार रुपये जमा झाल्याचा त्यांच्या व्यक्तिगत मोबाईलवर मेसेज आला होता. ते पूर्वी पत्रकार असल्यामुळे त्यांनी साताऱ्यातील एका पत्रकारांना त्याची माहिती दिल्यानंतर सदरचे वृत्त प्रसिद्ध केले. व काहींनी ते इतर दैनिकाच्या पत्रकारांना नेहमीप्रमाणे टाईप केलेली बातमी पोस्ट केली. त्यांनीही खात्री न करता फॉरवर्ड केलेली बातमी प्रसिद्ध केल्यामुळे अखेर सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन यांनी काँग्रेसचे सातारा जिल्हा सरचिटणीस श्री नरेश विठ्ठल देसाई यांना दिनांक १० ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत आपल्यावर फौजदारी का करू नये. असे विचारणा करून लेखी खुलासा करण्याचे पत्र दिलेले आहे. तसेच याबाबत सातारचे जिल्हाधिकारी यांनी सुद्धा श्री नरेश देसाई यांच्याशी याबाबत संपर्क साधला असल्याची माहिती मिळाली आहे. सदर मोबाईल मेसेज व वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या बातमी संदर्भात चांगलीच चर्चा रंगलेली आहे. थेट राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांना नोटीस पाठवल्यामुळे खळबळ माजली आहे. मुळातच कुर्ला येथे वास्तव्यास असलेल्या एका महिलेने ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरला होता. तसेच त्यांना लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले होते. परंतु श्री. देसाई यांच्या व्यक्तिगत मोबाईलवर लाडके बहिण योजनेचे पैसे जमा झाल्याचे मेसेज येऊ लागल्यामुळे त्यांनी याबाबत काही पत्रकारांना सांगितले होते. काहींनी फॉरवर्ड बातमीमुळे त्याचा प्रसारही केला. आता याबाबत श्री नरेश देसाई यांनी खुलासा करण्याचे तत्वतः मान्य केले असले तरी एखाद्या गोष्टीची खात्री न करता फॉरवर्ड बातमीमुळे सध्या सातारा जिल्हा परिषद व जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस यांच्यामध्ये आता खुलासा देण्याची वेळ आल्याचे नमूद करण्यात येत आहे. सदरची योजना अत्यंत पारदर्शक रित्या राबविण्यात येत आहे. यामध्ये कोणत्याही पैशाचा वापर होत नाही. दरम्यान, वस्तुनिष्ठ व घटनेच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकारांनी बातमी करताना आपण त्यावेळी उपस्थित नसलो तरी संबंधित यंत्रणेची खात्री करूनच बातमी प्रसिद्ध करावी. अशी विनंती करण्यात आलेली आहे…………………….

फोटो- पत्रकारांना अधिकृतरित्या माहिती देताना काँग्रेस जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई व सौ रजनी पवार व पदाधिकारी

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button