फलटण:- फलटण ग्रामीण पोलीसांची दमदार कामगिरी- जिल्ह्यांत व परजिल्हयात मोटार सायकल चोरी करणारी टोळी गजाआड .
प्रतिनिधी शुभम भापकर फलटण:-7972521412

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
सातारा जिल्ह्यांत व परजिल्हयात मोटार सायकल चोरी करणारी टोळी फलटण ग्रामीण पोलीसांनी पकडली..
प्रतिनिधी.शुभम भापकर
फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री.धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस झाले चार्ज.
*पोलीस अधीक्षक श्री.अजयकुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक श्री.अजित बो-हाडे व पोलीस उपअधीक्षक श्री.तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीसांची कारवाई.
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.अक्षय सोनवणे व पोलीस उपनिरीक्षक श्री.सागर अरागडे यांच्या जोडीची टिम वर्क कामगिरी.
२४ तास गणपती विसर्जन बंदोबस्त करून क्षणाची ही विश्रांती न घेता पडत्या मुसळधार पावसात धुमाळवाडी येथील ओढयातील पुराच्या पाण्यातून जिवाची पर्वा न करता आरोपींचा पाठलाग करून आरोपींना शिताफीने पकडून 1 आरोपींचेकडून मोटार सायकल चोरीचे ०९ व एच.टी.पी.पंम्प चोरीचा ०१ असे एकुण १० गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये एकुण ७,४५,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत एकुण ०३ जण अटकेत
तानाजी बरडे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण, यांचे मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक मा. धन्यकुमार गोडसे यांच्या नेतृत्वाखाली फलटण ग्रामीण पोलीसांची सातत्य पूर्वक चमकदार कामगिरी फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून मोटार सायकल चोरीचे गुन्हयांनी डोके वर काढले होते. मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक, सातारा मा, अजय कुमार बन्सल सो यांनी सूचना दिल्या होल्या. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक मा. अजित बो-हाडे सो उपविभागीय पोलीस अधिकारी मातानाजी बरके सो व पोलीस निरीक्षक मा धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत होणा-या मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध होऊन ते उघड करण्याकरीता गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून विशेष पथक तयार करण्यात आले होते. हे विशेष पथक वरील गुन्ह्यांच्या अनुषंगाने फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत मोटार सायकल चोरी अनुषंगाने आरोपीचा शोध घेत असताना आरोपी नामे १) श्रेयस उत्तम माळे रा. दुधेबावी ता. फलटण, जि. सातारा २) अमित विठ्ठल हुंबे रा. धुमाळवाडी ता. फलटण, जि. सातारा ३)गणेश अरुण जगदाळे रा.मोगराळे ता.माण जि.सातारा यांचा सहभाग असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्या माहिती वरुन वरील संशयित १) श्रेयस उत्तम नाळे रा. दुधेबावी ता. फलटण. जि. सातारा २) अमित विठ्ठल हुंबे रा. धुमाळवाडी ता. फलटण, जि. सातारा ३)गणेश अरुण जगदाळे रा. मोगराळे ता.माण जि.सातारा यांना २४ तास गणपती विसर्जन बंदोबस्त करून क्षणाची ही विश्रांती न घेता हत्या मुसळधार पावसात धुमाळवाडी येथील जोठ्यातील पुराच्या पाण्यातून जिवाची पर्वा न करता आरोपींचा पाठलाग करताना त्यामध्ये पोलीस नाईक काशिद हे किरकोळ जखमी झाले असताना देखील मनोधैर्य खचून देता पाठलाग करून आरोपींना शिताफीने पकडले आहे.
त्यांच्याकडे वरील गुन्ह्यांच्या अनुषंगाने विचारपूस करता त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु त्यास फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात आणून त्याचेकडे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्यपूर्ण तपास केला असता त्यांनी फलटण तालुक्यामध्ये तसेच मुंबई, पुणे शहर, खेडशिवापुर, शिरवळ, इंदापुर या ठिकाणाहून चोरलेल्या एकुण ०९ मोटार सायकल व शेतीसाठी औषध फवारणी साठी लागणारे एच.टी.पी. पंपाचे ०१ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यानुसार विविध गुन्ह्यांतील सुमारे ६,६५,०००/- रुपये किंमतीच्या ०९ मोटार सायकली व ०१ एम.टी.पी. पंम्प तसेच आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली ८०,०००/-रु. किमतीची मोपेड मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. सदरची मोटार सायकल ही आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे करण्यासाठी वापरलेचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. गुन्ह्यांचा तपास अद्याप सुरु असून अटक आरोपींचेकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कामगीरी मा. अजय कुमार बंसल सो, पोलीस अधीक्षक, मा. अजित बो-हाडे सो अपर पोलीस अधीक्षक, मा. तानाजी बरडे सो उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण यांच्या सूचनांनुसार पोलीस निरीक्षक मा.धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.पो.नि. अक्षय सोनवणे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, सहा. पोलीस फौजदार राऊत, पोलीस हवालदार प्रकाश खाडे, पोलीस नाईक अभिजीत काशिद, पोलीस नाईक वैभव सूर्यवंशी, पोलीस नाईक अमोल जगदाळे, पोलीस कॉस्टेबल महेश जगदाळे, पोलीस कॉस्टेबल विक्रम कुंभार, पोलीस कॉस्टेबल सचिन पाटोळे, पोलीस कॉस्टेबल निखील गायकवाड यांनी या कारवाईमध्ये भाग घेतला होता.