सातारा:-शिक्षक बँकेच्या चेअरमन पदाच्या यादवीने कोणाच होणार भलं…
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
शिक्षक बँकेच्या चेअरमन पदाच्या यादवीने कोणाच होणार भलं…
सातारा दि: (अजित जगताप) साताऱ्यात प्राथमिक शिक्षक बँकेच्या शताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात साजरा झाला. या कार्यक्रमाने प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांबाबतही लक्षवेधी चर्चा झाली. पण, आता शिक्षक बँकेच्या सत्तेसाठी यादवी उभी करण्यात कुणाचे भले होणार आहे. याचा आता शोध घेण्याची पाळी सभासदांवर आलेली आहे. साताऱ्यातील प्राथमिक शिक्षक यांची बँक सध्या राजकारणाचा अड्डा बनलेला आहे. प्राथमिक शिक्षक संघ व प्राथमिक शिक्षक समिती व घटक संघटना म्हणून प्राथमिक शिक्षकांच्या डझनभर संघटना आहेत. दर पाच वर्षांनी सत्तांतर होऊन प्राथमिक शिक्षक संघटनेचे संघ किंवा समिती यांची सत्ता असते. राजकारणामध्ये तत्व व निष्ठा बाजूला ठेवून युती व आघाडी होत आहे. ज्या ठिकाणी काही शिष्य नवीन पायंडा पाडत आहेत. त्यामध्ये आता काही प्राथमिक शिक्षक नेत्यांनी सुद्धा आपला पवित्र बदललेला आहे. प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे अभ्यासू व होतकरू चेअरमन किरण यादव व त्यांच्या संचालक मंडळाने शताब्दी महोत्सवी कार्यक्रम चांगल्या रित्या पार पाडला. त्यानंतर बँकेचे चेअरमन किरण यादव यांनी सोमवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी लोकशाही मार्गाने राजीनामा दिलेला आहे. त्यांच्या राजीनामा शस्त्रामुळे अनेक जण घायाळ झालेले आहेत. करायला गेलो गण.. आणि झाला मारु.. अशी अवस्था काहींची पाहण्यास मिळत आहे. मुळातच काही लाभार्थींना प्राथमिक शिक्षक बँकेच्या शताब्दी महोत्सव कार्यक्रमात योग्य तो लाभ मिळाला नाही. नाराज झालेल्या असंतुष्ट सवयीने प्राथमिक शिक्षक बँकेच्या आडून आपली नाराजीही प्रगट केलेली आहे.
प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन किरण यादव यांच्या राजीनामा नाट्य पूर्वीच अविश्वास ठरावाची गणगवळण झाली आहे. हे आता लपून राहिलेले नाही. प्राथमिक शिक्षक बँकेच्या १८ संचालकांपैकी पाच संचालक किरण यादव यांच्या सोबत असून इतर १५ संचालकांनी अविश्वास ठराव मंजुरीसाठी बँकेचे विशेष सभा बोलावण्याची मागणी उपनिबंधक सहकारी संस्था संजय कुमार सुद्रिक यांच्याकडे पत्राद्वारे केलेले आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी त्याबाबत निर्णय होणे गरजेचे असताना आता हा निर्णय विधानसभेच्या निवडणुकीनंतरच होईल की काय? अशी शंका घेतली जात आहे. प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन किरण यादव यांच्या पदाच्या राजीनामा नाट्य मुळे आता नवीन चेअरमन निवडीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. त्यांच्या लगीन घाईत वाजंत्री म्हणून काम करण्यासाठी आतापासून काहीजण तयार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मुळातच सर्वांनाच विश्वासात घेवून प्राथमिक शिक्षक बँकेच्या शताब्दी महोत्सवाची तयारी करण्यात आली होती. पण काही नेत्यांना कार्यक्रमाच्या आदल्या रात्रीच त्या विरोधात पत्रक बाजी केली .अशी शंका आता प्राथमिक शिक्षक सभासद घेऊ लागलेले आहेत. तुझे माझे पटेना,,, तुझ्याशिवाय चेअरमन पदाबाबत अविश्वास ठराव होईना .अशी अवस्था बघण्यास मिळत आहे. भविष्यात नवीन चेअरमन पदाची माळ ज्यांच्या गळ्यात पडणार आहे त्यांना शिक्षक नेत्याच्या नियमाप्रमाणे अटी व शर्ती लागू आहेत. हे मात्र विसरून चालणार नाही.
—————————-&——
फोटो -चेअरमन किरण यादव