ताज्या घडामोडी

वाई:- डिजिटल बँकिंग काळाची गरज – “श्री. अविनाश जोशी”

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

RPS STAR NEWS

वाई दि 08
डिजिटल बँकिंग काळाची गरज – “श्री. अविनाश जोशी”

 

वाई वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील पदवीधरांना आजच्या युगात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा. तसेच यासाठी विद्यार्थ्यांनी तांत्रिक ज्ञान व विविध कौशल्ये आत्मसात करून आपले करिअर घडवावे असे मत रिझर्व्ह बँकेतील निवृत्त व्यवस्थापक श्री. अविनाश जोशी यांनी व्यक्त केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या वतीने “बदलते बँकिंग क्षेत्र आणि नोकरीच्या संधी” या विषयावर ते बोलत होते. याप्रसंगी जनता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी, महाविद्यालयाचे प्राचार्य व वाणिज्य व व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. गुरुनाथ फगरे, तीन्ही शाखांचे उपप्राचार्य श्री. भीमराव पटकुरे, प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, डॉ. हणमंतराव कणसे तसेच अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. राजेश गावित उपस्थित होते.
श्री. अविनाश जोशी पुढे म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीला बँकिंग क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी बदलते बँकिंग क्षेत्र आणि तंत्रज्ञान याची सखोलओळख झाली पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी बँकिंग क्षेत्रातील परीक्षांची तयारी कठोर मेहनत घेऊन, जिद्द व चिकाटीने सातत्याने प्रयत्न करून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ. जयवंत चौधरी यांनी बँकिंग क्षेत्र व त्यातील उपलब्ध संधी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील ग्रंथालय व इतर सुविधांची मदत घेऊन या परीक्षांची उत्तम तयारी करावी असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी बँकिंग क्षेत्रातील विविध संधी कशा मिळवता येतील व त्यातून विद्यार्थ्यांना स्वतःचे करिअर कसे घडवता येईल याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत श्रीमती दिपाली चव्हाण यांनी केले, प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री. संदीप पातुगडे तर सूत्रसंचालन वाणिज्य मंडळातील विद्यार्थिनी कु. इशिका देव व आभार कु. श्रेया शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. जयवंत पवार, श्री. रविंद्र जमदाडे, श्रीमती प्रज्ञा पवार, कु. श्रृती यादव व कु. रेखा भोसले यांनी परिश्रम घेतले.मार्गदर्शन करताना श्री. अविनाश जोशी शेजारी संस्था सचिव डॉ. जयवंत चौधरी आदी मान्यवर तेथे उपस्थित होते.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button