ताज्या घडामोडी

सातारा:-साताऱ्यात भिमाई स्मारक उभारणीसाठी पाठपुरावा करणार – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

साताऱ्यात भिमाई स्मारक उभारणीसाठी पाठपुरावा करणार
– केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले.

सातारा, दि. ३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भिमाई यांचे भिमाई भूमीत स्मारक व्हावे. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
मातोश्री भिमाई रामजी आंबेडकर यांचे सातारा येथील स्मारकाच्या जागेची पहाणी केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले यांनी केली. यावेळी ते बोलत होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण साताऱ्यात झाले. माता भिमाई यांचे सातारा येथील स्मारक भव्य दिव्य होण्यासाठी शासनाकडून निधी मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याचबरोबर स्मारकाला लागणाऱ्या अतिरिक्त जागेबाबत स्थानिक प्रशासनाचेही सहकार्य घेऊ, असेही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्मारकाच्या जागेची पहाणी करताना सांगितले.
यावेळी रिपब्लिकन पक्ष महिला आघाडी अध्यक्ष सौ . सीमाताई आठवले, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे, राष्ट्रीय सरचिटणीस गौतम सोनवणे, सातारा जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड व भिमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. पार्थ पोळके, विजयराव ढमाळआणि अजित जगताप, आप्पा तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button