कणकवली:-श्री देव काशीकलेश्वराचा ५ नोव्हेंबरला जत्रोत्सव.
पत्रकार शैलेश मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

श्री देव काशीकलेश्वराचा ५ नोव्हेंबरला जत्रोत्सव.

कणकवली (वा.) त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कलमठ गावचे ग्रामदैवत श्री देव काशीकलेश्वर मंदिरात बुधवार ५ नोव्हेंबरला जत्रोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार
पडणार
आहेत.सकाळच्या सत्रात धार्मिक
कार्यक्रम
होतील.
सायंकाळी ६ वा.
दीपोत्सव, ७.३० वा. बुवा
सुंदर मेस्त्री व दुर्गेश मिटबावकर यांच्यात डबलबारी भजनाचा सामना होईल. या दोघांना सिद्धेश मेस्त्री, आयुष परब हे संगीतसाथ देणार आहेत. या सामन्याचे सूत्रसंचालन निलेश काणेकर करणार आहे. रात्री ११.३० वा. टिपर पाजळणे, १२ वा. देवांची तरंग प्रदक्षिणा, रात्री १२.३० वा. दशावतारी नाटक सादर होईल. तरी सर्वांनी जत्रोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थान व्यवस्थापन समिती व ग्रामस्थांनी केले आहे. कलमठचे ग्रामदैवत असलेले काशीकलेश्वर हे जागृत देवस्थान आहे व हा देव संकटसमयी भक्तांच्या हाकेला धावून येतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. देशात अनेक ठिकाणी महादेवाची कलेश्वर. कालेश्वर, कुलेश्वर अशा विविध नावांनी मंदिरे आहेत. कलमठ येथील हे मंदिर काशी कलेश्वर नावाने ख्यातकीर्त आहे.



