ताज्या घडामोडी

सातारा शहरात कंप्रेसर स्फोटाने एक ठार तर दोन गंभीर जखमींवर उपचार सुरू.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

सातारा शहरात कंप्रेसर स्फोटाने एक ठार तर दोन गंभीर जखमींवर उपचार सुरू.

 

सातारा दि: सातारा शहरातील नगरपालिका ते माची पेठ रस्त्यावरील एका वाहन सर्विसिंग व दुरुस्ती सेंटर मध्ये कॉम्प्रेसरचा अचानक स्फोट झाला .यामध्ये एक जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. गंभीर जखमींवर खाजगी रुग्णालयात तातडीने उपचार सुरू झालेले आहेत. सातारा शहरामध्ये बुधवार दिनांक २ ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजता छत्रपती राजघराण्यातील अदालत वाडा नजीकच्या एका वाहन सर्विसिंग सेंटर मध्ये मुनीर पालकर वय ३५ रा. गुरुवार परज, सातारा व हरून बागवान व उमर बागवान हे काम करत होते. अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे सर्विसिंग सेंटर मधील कंप्रेसरचा स्फोट होऊन मुनीर पालकर वय -३० हे उंच उडून रस्त्यावर कोसळून पडले. त्या ठिकाणी रक्ताचा सडा पडला होता. तर सेंटरमध्ये बसलेले हरून व उमर बागवान हे गंभीररित्या जखमी झाले . सदरची घटना दुपारी घडल्यामुळे या दाहकतेने परिसरातील काही इमारतीच्या खिडकीच्या काचा फुटून मोठा आवाज झाला. सदरची घटना घडल्यानंतर घटनास्थळी सातारा पोलीस दल बॉम्बस्फोट व श्वान पथक दाखल झाले .पोलिसांना या ठिकाणी झालेली गर्दी दूर करण्यास सुरुवात केली. दुर्घटनेनंतर या परिसरात पांढऱ्या रंगाचा धूर पसरला होता . नेमकं काय घडले ? यासाठी स्थानिक रहिवाशी व वाहन चालक घाबरून एकमेकांना विचारपूस करत होते. या घटने नंतर तातडीने यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली . यावेळी सातारचे भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलेले आहे. तर या अपघातात मुनीर पालकर हे ठार झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दुपारच्या वेळी सदरचा घटना कशामुळे झाली ?त्याचा तपास सातारा पोलीस यंत्रणा करू लागली आहे.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button