कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-चोराडे- म्हासुर्णे रस्त्यावरील खड्डयामुळे अपघाताचा धोका वाढला : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष…..

पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार प्रमोद देवाडीगा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

चोराडे- म्हासुर्णे रस्त्यावरील खड्डयामुळे अपघाताचा धोका वाढला : बांधकाम विभागाचे दुर्लक्ष…..

 

पुसेसावळी : खटाव तालुक्यातील पाटण – पंढरपुर या राज्य मार्गावरील रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडले असून अनेक मार्गावर खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा’ असा अनुभव वाहनचालकांना येत असून सध्या
चोराडे ते चितळी रस्त्यावर शेकडो खड्डे पडले असून वाहन चालकांना गाडी चालवताना कसरत करावी लागत आहे.

खटाव तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे रस्ते कामाच्या दर्जाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दररोज या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वाहनांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत असून एका पावसाळ्यात रस्ते खराब झाल्याने ठेकेदाराच्या कामाच्या मर्यादा स्पष्ट होत आहेत, त्यामुळे वाहनचालकां मध्ये संतापाची लाट उसळली आहे.

तरी पंढरपूरकडे जाणारा हा मार्ग असल्यामुळे या रस्त्यावर प्रचंड वाहतूक असते, या  रस्त्यावर  खड्डे पडले असून रस्त्यावरून खड्ड्यांमुळे चालणे शक्य होत
नाही. या रस्त्यावरून पादचारी लोकांनाही या खड्ड्यांचा त्रास जास्त प्रमाणात सहन करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाला एखादा मोठा अपघात पाहायचाय की काय हाही प्रश्न या मार्गावरून प्रवास करणा ऱ्यांना पडत असतो. त्याच बरोबर वाहनांचेही मोठ नुकसान होत आहे. तरी संबंधित विभागाने या रस्त्या वरील खड्डे मुजविण्यात यावेत, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

 

चौकट:
——
चोराडे -म्हासुर्णे रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून रात्रीच्या वेळी हा खड्डा न दिसल्याने मोठा अपघात घडू नये, नागरिकांनी अनेक वेळा तक्रार केल्यानंतरही खड्डे जैसे थे आहेत,

 

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button