पुणे:-पुण्यात महाराष्ट्रातील बाजार समित्यांचे दि 3 ऑक्टोंबर रोजी राज्यस्तरीय परिषद
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा
RPS STAR NEWS
पुण्यात महाराष्ट्रातील बाजार समित्यांचे दि 3 ऑक्टोंबर रोजी राज्यस्तरीय परिषद
पुणे दि:
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांच्यावतीने महाराष्ट्र राज्यातील ३०५ बाजार समित्या व त्यांचे ६२३ उप बाजारांचे माध्यमातून राज्यात उत्पादित शेतमालाची विक्री व्यवस्था कामकाज ४० वर्षापासून सुरु आहे. हे करीत असताना राज्यात कृषी पणन व्यवस्थेत अद्ययावतपणाबरोबरच सुसूत्रता आणि समन्वयता आणण्याच्या दृष्टीने गुरुवार दिनांक 3 ऑक्टोंबर रोजी राज्यस्तरीय पुणे येथे परिषद आयोजित केली आहे.
कृषि पणन मंडळाने कृषी पणन व्यवस्थेत आधुनिकीकरण, सुधारणा आणण्याबरोबरच राज्यात कृषी पणन व्यवस्था मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विविध प्रकल्प व योजना राबविणे, नवीन कार्यक्रम आखणे तसेच शेतकरी आणि शेतक-यांच्या संस्थांच्या विकासासाठी नियोजनबध्द प्रयत्न करणे. महाराष्ट्र राज्यातील बाजार समित्यांचे पदाधिकारी,अधिकारी, कर्मचारी यांचेसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. राज्यात कृषि मालाच्या निर्यातीसाठी निर्यात सुविधा केंद्रांची उभारणी व निर्यातवृध्दी करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागात हे कामकाज करीत असताना, राज्यातील बाजार समित्यांचे कालानुरूप बदल,शेतमालाच्या विपणनामध्ये अंगीकारावयाच्या आधुनिक बाबी, शेतकरी व इतर सर्व बाजार घटकांना
द्यावयाच्या सोई-सुविधा, त्यात येणा-या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाय योजना इत्यादी विषयाचे
अनुषंगाने ही परिषद होत आहे.
महाराष्ट्र राज्याचेअल्प संख्यांक विकास व औकाफ,
पणन) महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे नामदार श्री अब्दुल सत्तार यांनी राज्यातील सर्व बाजार
समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिव यांची दि. 3 ऑक्टोंबर रोजी रोजी पुणे येथे ग. दि. माडगुळकर
नाट्यगृह, छत्रपती संभाजी महाराज चौक, प्राधिकरण, निगडी, पुणे येथे राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन
करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सदर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाघाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते
होणार असून, सदर प्रसंगी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. ना. श्री.अजित पवार, उपमुख्यमंत्री यांचीही उपस्थिती राहणार आहे. सदर परिषदेस डॉ. राजगोपाल देवरा (भा.प्र.से.), अपर मुख्य सचिव, नियोजन, सहकार व पणन, महाराष्ट्र
राज्य, श्री. विकास रसाळ, पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे व श्री. प्रविणकुमार नहाटा, सभापती,
महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ तथा सदस्य महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे
उपस्थित राहणार आहेत.
सदर या परिषदेस राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, सचिव, राज्य बाजार समिती संघाचे सदस्य यांना निमंत्रीत केलेले आहे.
सदर परिषदेमध्ये राज्यातील बाजार समित्यांचे आधुनिकीकरण, बाजार समितीनिहाय विकास आराखडा, बाजार समित्यांना त्यांचे दैनंदिन कामकाजात येणा-या अ अडचणी व उत्पन्न वाढीसाठी करावयाच्या उपाययोजना इत्यादीबाबत चर्चा अपेक्षित असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे कार्यकारी संचालक श्री संजय कदम यांनी दिली. सदर परिषदेस राज्यातील सर्व निमंत्रीत बाजार समित्यांचे पदाधिकारी, अधिकारी तसेच शासकीय अधिकारी उपस्थित रहाणार आहेत. यासाठीश्री. जे. जे. जाधव, सहाय्यक सरव्यवस्थापक, बाजार समिती विभाग, कृषि पणन मंडळ, पुणे मोबाईल क्र. 9049996123 यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.
——————————————-
ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏