वाई:-विद्यार्थ्यांनी कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज : डॉ अजित एकल.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
RPS STAR NEWS
वाई दि.20
विद्यार्थ्यांनी कौशल्ये आत्मसात करणे काळाची गरज : डॉ अजित एकल.
रसायनशास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांना केमिकल व फार्मा कंपनीमध्ये अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, त्यासाठी लागणारी कौशल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत त्याचबरोबर आपल्या विषयाचे ज्ञान सखोल असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन इन्स्टा व्हिजन,सातारा चे संचालक डॉ अजित एकल यांनी केले.
जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयामध्ये अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत रसायनशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित ” अडवान्सड इंस्ट्रुमेंटेशन टेक्निक फॉर इंडस्ट्री” या एकदिवसीय कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. यावेळी रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा.(डॉ.) ज्ञानदेव झांबरे, कला, वाणिज्य व विज्ञान विभागांचे उपप्राचार्य अनुक्रमे प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, श्री. भीमराव पटकुरे, डॉ. हणमंत कणसे, डॉ. संदीप वाटेगावकर, डॉ.आनंद घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. एकल पुढे म्हणाले, आजच्या आधुनिक काळात विद्यार्थ्यांना अत्याधुनिक रासायनिक उपकरणांची माहिती असणे गरजेचे आहे. मिळालेल्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण उपयोग करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेतल्या पाहिजेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष इंडस्ट्री मध्ये जाऊन कौशल्यपूर्ण प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतल्याने नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. खेडेगावातील मुलांना मुलाखतीचे तंत्र अवगत असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच काळानुरूप बदलत्या तंत्रज्ञानाचा ध्यास घेणे गरजेचे आहे.
अध्यक्षीय मनोगतामध्ये प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले” तरुणांनी आपली क्षमता ओळखली तर तो आपल्या बुद्धीच्या जोरावर जगालाही प्रभावित करू शकतो. पुस्तकी ज्ञान व्यवहारात वापरता आले पाहिजे. सखोल ज्ञानाबरोबरच विविध कौशल्ये आत्मसात केल्यास रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असून तुम्ही उद्योजक ही बनू शकता”
प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे आपल्या मनोगतात म्हणाले, रसायनशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांना भविष्य काळात विविध क्षेत्रांत नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध असून त्यांनी त्यासाठी लागणारी कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. (डॉ.) झांबरे यांनी या कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करीत ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना भविष्यात कशाप्रकारे फलदायी ठरेल हे सांगितले.
रसायनशास्त्र विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. संदीप वाटेगावकर यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएच. डी मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये संपादक मंडळामध्ये निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. फगरे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
पाहुण्यांची ओळख रसायनशास्त्र विभागातील शिक्षक श्रीमती धनश्री शिर्के यांनी करून दिली, तर श्रीमती अक्षता संकपाळ व श्रीमती प्रियांका जाधव यांनी सूत्रसंचालन केले. श्रीमती निकिता सुर्वे यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी श्रीमती दिपाली पाटील, श्रीमती राजेश्वरी कामटे, श्रीमती मंजिरी पिसाळ, श्रीमती पूजा जायगुडे, श्रीमती ऋतुजा भोईटे, श्री. सोमनाथ सानप, श्री. अजित पांढरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी भास्कर घोणे, अनिल सावंत, अनिल शेलार, अनिल लाखे, अनिल बोडरे, दत्ता काळे, चेतन तावरे, किशोर पिसाळ व शुभम पिसाळ यांनी परिश्रम घेतले.
फोटो टीप- कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. अजित एकल, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे,डॉ.हणमंत कणसे, श्री.भीमराव पटकुरे, प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे.