अहिल्यानगर:-‘एक गाव, एक गणपती’मधून सामाजिक एकोप्याचा संदेश; हमीदपूर, खोसपुरी व आव्हाडवाडीचा पुढाकार.
पत्रकार अतुल भापकर नगर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

अहिल्यानगर:-‘एक गाव, एक गणपती’मधून सामाजिक एकोप्याचा संदेश; हमीदपूर, खोसपुरी व आव्हाडवाडीचा पुढाकार.

अहिल्यानगर : गणेशोत्सवाच्या काळात गावागावांमध्ये एकोपा, सामाजिक सलोखा आणि बंधुभाव कायम राहावा, या उद्देशाने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने ‘एक गाव, एक गणपती’ हा उपक्रम राबविण्यात आला.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अहिल्यानगर तालुक्यातील हमीदपूर, खोसपुरी आणि आव्हाडवाडी या तीन गावांनी पुढाकार घेत ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम उत्साहात राबविला.
या उपक्रमामुळे गणेशोत्सवाच्या माध्यमातून गावातील नागरिकांमध्ये एकी, सामाजिक सलोखा आणि सामूहिक सहभागाचा संदेश देण्यात आला. गावातील विविध गणेश मंडळांनी एकत्र येत उपक्रमाला प्रतिसाद दिल्याने एमआयडीसी पोलिसांकडून या मंडळांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी एमआयडीसी पोलिसांतर्फे हमीदपूर, खोसपुरी आणि आव्हाडवाडी या तिन्ही गावांना प्रत्येकी २१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. पोलिसांच्या या उपक्रमामुळे गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
‘एक गाव, एक गणपती’च्या माध्यमातून गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि गावाच्या एकजुटीचा उत्सव ठरू शकतो, हे या तीन गावांनी आपल्या सहभागातून दाखवून दिले.




