ताज्या घडामोडी

सातारा शहरातील गोडोली विसर्जन तळ्यात सुमारे तीन हजार गणेश मूर्तींचे विसर्जन……

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

सातारा शहरातील गोडोली विसर्जन तळ्यात सुमारे तीन हजार गणेश मूर्तींचे विसर्जन……

सातारा दि: श्री गणरायाच्या आगमनानंतर आता अनंत चतुर्दशी दिवशी निरोपाची जय्यत तयारी सातारा शहर नगर परिषदेने विविध ठिकाणी केली आहे. त्यापैकी गोडोली येथील तलावात सुमारे तीन हजार सार्वजनिक व घरगुती गणरायाच्या मूर्तीचे शेवटच्या दिवसापर्यंत विसर्जन करण्यात आले. विशेष बाब म्हणजे या ठिकाणी सातारा नगरपालिकेच्या वतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यवस्था केल्याबद्दल गणेश भक्तांनी सातारा नगरपालिकेला धन्यवाद दिले आहेत.
सातारा शहर व परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात गणरायाच्या आगमनानंतर दहा दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच रक्तदान शिबिर, अन्नदान, सत्यनारायणाची महापूजा, आरती, आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध सामाजिक उपक्रम राबवणात आले होते. डॉल्बी व लेसर किरणांना फाटा दिल्यामुळे सातारकर यांनी चांगलाच मनमुराद आनंद घेतला.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व व्यक्तिगत गणराया व गौरी सजावट तसेच यानिमित्त साकारलेले देखावे पाहण्यासाठी गणेश भक्तांची पहाटेपर्यंत गर्दी उसळली होती.आता गणरायाला निरोप देण्यासाठी सातारकरांनी विशेषता सातारा नगरपालिकेने कृत्रिम रित्या तलावाची निर्मिती केली. या ठिकाणी गणरायाच्या मूर्ती विधिवत विसर्जन करण्यात येत आहे .त्याचबरोबर या ठिकाणी श्री गणरायासाठी असलेल्या हार- पुष्प निर्मल्य व पाच खडे, पिण्याची पाणी आणि लाईफ गार्ड, तराफा, विद्युत पुरवठा याची सुविधा करण्यात आलेली आहे.
गोडोली येथील कल्याणी शाळेत नजीक कृत्रिम तलावामध्ये आतापर्यंत तीन हजार सार्वजनिक व घरगुती गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आलेले आहे. या ठिकाणी येणाऱ्या मूर्ती विसर्जन करताना भाविकांना आनंद अश्रू येत असल्यामुळे खऱ्या अर्थाने श्री गणरायाच्या आनंदी सोहळा संपन्न झाला. हे पाहण्यास मिळत आहे. सातारा नगर परिषदेने कल्याणी शाळेत नजीक गोडोली तळ्यामध्ये सर्व सुविधा केली आहे .
यासाठी सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री अभिजीत बापट, अतुल दिसले, प्रदीप साबळे, रवींद्र शेलार, सुभाष राठोड, राहुल वायदंडे ,शुभम शिरतोडे, जगदीश मुळे, महेश माने, निकिता साळुंखे, देवा दळवी, सुरेश वायदंडे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
गेले आठवडाभरापासून प्रत्येक दिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन होत आहे. या तळ्यामध्ये स्वच्छ पाणी असल्यामुळे पारदर्शक रित्या शेवटपर्यंत गणेश मूर्तीचे दर्शन होत आहे. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आलेली आहे. गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…. मोरया रे मोरया…. बाप्पा मोरया…. चा जयघोष व पारंपारिक वाद्य यामुळे खऱ्या अर्थाने मंगलमय वातावरणात विसर्जन होत असल्याने भाविक सुखावले आहेत. तसेच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, ज्येष्ठ माजी नगरसेवक डी.जी बनकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे. रात्री बारा वाजेपर्यंत स्वयंसेवक व कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. अशी माहिती काही गणेश भक्तांनी दिली आहे .

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button