आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जावळी:-मेढा नियोजित घनकचरा प्रकल्पास सोनगाव ग्रामस्थांचा विरोध…..

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS

मेढा नियोजित घनकचरा प्रकल्पास सोनगाव ग्रामस्थांचा विरोध…..

आनेवाडी

जावली तालुक्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या मेढा नगरपंचायतीने सोनगाव येथील जागेत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नियोजित केलेला आहे. हा घनकचरा प्रकल्प होवू नये. यासाठी सोनगाव ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला. तशा आशयाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे. त्याच निवेदनाला ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून मेढा नगरपंचायतीला दिलेल्या सुचनांचे पत्र सादर केलेले आहे.
आज मंगळवारी दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई व आमदार शशिकांत शिंदे यांची भेट घेऊन सोनगाव ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी सोनगाव ग्रामस्थ जयदीप शिंदे, जगन्नाथ पिसाळ, मधूकर शिंदे, जितेंद्र शिंदे, लक्ष्मण चिकणे, जितेंद्र चिकणे, विश्वनाथ शिंदे, अविनाश तिवाटणे, युवराज शिंदे, नारायण शिंदे, संपत चिकणे, नथूराम चिकणे, सत्यवान शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जयदीप शिंदे म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी चार महिन्यापूर्वी सोनगाव ग्रामस्थाबाबत बाबत एक अन्यायकारक आदेश काढला आहे. मेढा नगरपंचायतीचा कचरा सोनगावच्या गायरान क्षेत्रात टाकण्याचा घाट घातला आहे. या निर्णयाचा तीव्र निषेध करत आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी २०२१ साली सुद्धा ग्रामसभेचा ठराव पुर्णपणे विरोधी असून सुद्धा गायरान या क्षेत्रात पुर्वी वीज वितरण कंपनीला जागा दिलेली आहे त्यातली अर्धी जागा शिल्लक असताना ती जागा आमच्या गावातील पाळीव जनावरांना गवत चरण्यासाठी होती. २००आंब्याची झाडे आहेत. त्याचा विचार न करता मेढा नगरपंचायतीचा नियोजित घनकचरा प्रकल्प सोनगावच्या गायरान जमिनीत करण्यात येणार आहे. तो आदेश रद्द करावा. त्याऐवजी मेढा नगरपंचायतीच्या हद्दीत शासकीय जागा उपलब्ध आहेत. मेढयापासून सोनगाव हे तेरा किलोमीटरवर आहे. त्याचा कचरा येथे आणायचा आणि विल्हेवाट लावायची ही योग्य बाब नाही.
प्रतापगड कारखाना कामगार वसाहत आहे. कारखान्याचे ऑफिस, शाळा, वाढीव गाव आहे. लोकवस्तीत हा कचरा प्रकल्पाचा घाट कशासाठी? हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सदर निवेदनाची तपासणी करून योग्य ते निर्णय घेतला जाईल असे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

ACLS TIMES” YOUTUBE चॅनेल ला LIKE SUBSCRIBE आणि COMMENT करा. 🙏

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button